AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya Encounter : रोहित आर्याला भेटलेल्या ‘त्या’ कलाकारांभोवतीही चौकशीचा फास, कोणाचा समावेश ?

पवईतील आर.ए.स्टुडिओमध्ये घडलेल्या ओलीस नाट्यामुळे मुंबई हादरली. थकबाकीपोटी रोहित आर्याने लहान मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी यशस्वी सुटका केली, पण चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक मराठी कलाकारांची चौकशी होणार असून, मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Rohit Arya Encounter : रोहित आर्याला भेटलेल्या 'त्या' कलाकारांभोवतीही चौकशीचा फास, कोणाचा समावेश ?
रोहित आर्या एन्काऊंटर केस अपडेट
| Updated on: Nov 04, 2025 | 9:41 AM
Share

गेल्या आठवड्यात गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबईत मोठी खळबळ माजली. कारण पवईतील आर.ए.स्टुडिओमध्ये काही लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेलण्यात आलं होतं. शिक्षण विभागासाठी केलेल्या कामानंतर पैशांच्या थकबाकीमुळे रोहित आर्या (Rohit Arya) या इसमाने ऑडिशनचा घाट घालत काही मुलांना बोलावलं होतं, आणि त्यांच्यापैकीच काही जणांना ओलीस ठेवत त्याने अनेक मागण्या केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी वॉशरुममधून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली. आणि चकमकीदरम्यान रोहित आर्याचा गोळी लागून मृत्यू झाला.

या ओलीस नाट्यामुळे फक्त मुंबईच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरला असून याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होते आहेत, काही अपडेट्सही समोर येत आहेत. एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या रोहित आर्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही नुकताच समोर आला आहे. जे. जे. रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आलं. रोहित आर्याचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला. त्या गोळीचे स्वरूप पाहता त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

त्या कलाकारांची होणार चौकशी

दरम्यान याप्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. पवईतील ज्या आर. ए. स्टुडिओमध्ये हे ओलीस नाट्य रंगल, त्याचा सूत्रधार असलेल्या रोहित आर्याने काही ऑडिशन घेतल्या, त्याच स्टुडिओमध्ये मराठी कलाविश्वाकतील काही नामवंत कलाकारांनी भेट दिली होती. जेष्ठ अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री उर्मिला कोठारे, मीनल कपूर, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान, अंकुश जोशी असे अनेक कलाकार त्या स्टुडिओत येऊन गेले होते. त्या सर्वांची आता चौकशी होणार असल्याचे समजते.

Rohit Arya Encounter : रोहित आर्या प्रकरणात मोठा खुलासा, दीपक केसरकर यांनी काय दिली कबुली?

रोहित आर्याच्या एन्काऊंटरप्रकरणी मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी समिति नेमण्यात आली आहे. या प्रकरणात आर.ए.स्टुडिओला गेलेल्या, रोहित आर्याची भेट घेतलेल्या कलाकारांचीसुद्धा चौकशी होणार आहे. रोहित आर्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचा जबाब नोंदवला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टुडिओमध्ये लहान मुलांना ओलिस ठेवण्याचा प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी रोहितने बरीच तयारी केली होती. त्याने शॉर्टफिल्मसाठी शेकडो बालकलाकारांचे व्हिडिओ मागून घेतले आणि त्यातील 80 जणांची निवड केली. त्यानंतर 35, 20 आणि अखेर 17 बालकलाकारांचे त्याने चार दिवसांचे वर्कशॉप घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, या चार दिवसांच्या काळात मीनल कपूर, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान, अंकुश जोशी हे कलाकार स्टुडिओत येऊन गेले होते. त्यामुळे या सर्व कलाकारांची आता चौकशी होणार आहे.

ऋचिता जाधवशीही साधला होता संपर्क

याच आरए स्टुडिओत ऋचिता जाधव या अभिनेत्रीलाही बोलवलं होतं अशी माहिती समोर आली होती. एक चित्रपट करायचा असून त्यासाठी ऑडिशन ठेवण्यात आल्याचा रोहितने भासवले. त्याच कटाचा भाग म्हणून त्याने अभिनेत्री ऋचिता जाधव हिच्याशीही संपर्क साधला होता. त्याने तिला कॉल केला , मी एक चित्रपट करतोय, त्यात तू काम करशील का अशी त्याने विचारणा केली. तिने होकार दिल्यावर त्याने तिला स्टुडिओत बोलावलं होतं, त्यांची भेटही ठरली होती. मात्र त्याच काळात रुचिताच्या घरात मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे तिने भेट जमत नसल्याचे सांगत स्टुडिओत येणार नसल्याचे कळवले. त्यामुळे रोहित व रुचिता यांची भेट झाली नाही. खुद्द ऋचिता जाधवनेच टीव्ही 9 मराठीशी बोलताना हाँ सर्व खुलासा केला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.