Pune Crime | वाढदिवशीच अमिरला संपवण्याचा होता कट! कट फसून 12 तासांत 12 जणांना अटक

अमीर आणि त्याचे मित्र स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले. त्याच दिवशी रात्री उशिरा अमीर खान त्याच्या मित्रांना हत्यारांनिशी गेऊन सूरज आणि त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले. पण

Pune Crime | वाढदिवशीच अमिरला संपवण्याचा होता कट! कट फसून 12 तासांत 12 जणांना अटक
Pune crime
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:14 PM

पुणे : बिबवेवाडी (Bibwewadi, Pune) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या टोळीला (Gang) पोलिसांना 12 तासांच्या आत गजाआड केलंय. हत्येचा (Murder) प्रयत्न करणं, वाहनांची नासधूस करणं आणि दहशत (Terror) माजवण्याचे प्रकार या टोळीकडून सुरु होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) 12 तासांच्या आतच या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. वाढदिवशीच एका टोळीतील तरुणाला संपवण्याचा डाव आखण्यात आला होता. पण त्यासाठी हल्ला करायला केल्यानंतर पळ काढलेल्या तरुणानं बदला घ्यायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे बदला घेण्यासाठी जेव्हा प्रतिहल्ला करण्यात आला, तेव्हा माजवण्यात आलेल्या दहशतीमुळे नागरिकांना अखेर पोलिसात धाव घेतली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

नेमकं काय घडलं होतं?

दोन गटात वाद सुरु होता. काकडे वस्तीत राहणारा अमीर खान आणि शेळके वस्तीत राहणार सूरज आणि आकाश कोळी यांचं एप्रिल महिन्यापासूनच भांडण सुरु होता. डिसेंबर महिन्यात या भांडणारा उद्रेक झाला. वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सूरज कोळी आणि त्याचे साथीदार अमीरला मारण्यासाठी गेले. त्यामुळे अमीर आणि त्याचे मित्र स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले. त्याच दिवशी रात्री उशिरा अमीर खान त्याच्या मित्रांना हत्यारांनिशी गेऊन सूरज आणि त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले. पण घरं माहीत नसल्यानं त्यांनी शेळके वस्तीतील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

गुंडांचा धुडगूस!

Pune Crime CCTV

Pune Crime CCTV

यावेळी अमीर आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या तोडफोडी 2 ऑटो रिक्षा आणि एका टेम्पोच्या काचेची नासधूस करण्यात आली. कोयते आणि तलवारींनी वार कर दुचाकी आणि मोपेड गाडीवरही वार करण्यात आले. मोठमोठ्या आरडाओरडा करन दहशत माजवण्याचाही प्रयत्न या गुंडांकडून सुरु होता. इतकंच काय तर वस्तीत राहणाऱ्या निष्पाप नागरिकांवरही या टोळीनं धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या सगळ्या प्रकरणी प्रचंड दहशतीत असलेल्या वस्तीतील लोकांनी अखेर पोलीस ठाणं गाठून रितसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना बेड्या ठोकल्यात.

12 तासांत गजाआड

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं कारवाई केली. या कारवाई तक्रार केल्यापासूनच्या 12 तासांच्या आतच सर्व 12 जणांना अटक करण्यात आली. यावेळी सर्व संशयित आरोपींकडून त्यांच्याकडील हत्यारंही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या का कारवाईनंतर आत मोकाट टोळीयुद्ध करत फिरणाऱ्यांना अद्दल घडते का, हेही पाहणं महत्त्वाचंय.

इतर बातम्या – 

अकोला जिल्हामधील कलंबा येथे शेतशिवारात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती

Good News | व्हॉट्सअप युजर्ससाठी गुडन्यूज, न आवडणाऱ्या लोकांपासून लपवा ओळख, स्टेट्स

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.