Pimpri Chinchwad crime | ”तुम्ही पोलीस काय ,फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? ” तरुणाने पोलिसांच्या सोबत केलं ‘हे’ कृत्य

Pimpri Chinchwad crime | ''तुम्ही पोलीस काय ,फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? '' तरुणाने पोलिसांच्या सोबत केलं 'हे' कृत्य
प्रातिनिधिक छायाचित्र.

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? असे म्हणत महाडिक यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावर चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे फिर्यादी महाडिक यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आला. चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने महाडिक यांच्यासोबत वादावादी सुरु केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 06, 2022 | 1:24 PM

पिंपरी – वाढत्या गुन्हेगारी बरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत गैरवर्तनाचे प्रकारहीदिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी- चिंचवड शरात त वाहतु पोलिस कर्मचाऱ्यांच्या सोबत हुज्जत घालत त कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकत नेमप्लेट तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 35 युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी घडली घटना

भोसरी येथील गुडलक चौकात पोलीस कर्मचारी दिनकर महाडिक कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी महाडिक ड्युटीवर कार्यरत असताना आरोपी तिथे आला.  चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? असे म्हणत महाडिक यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावर चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे फिर्यादी महाडिक यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आला.

चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने महाडिक यांच्यासोबत वादावादी सुरु केली. त्यानंतर आरोपीने महाडिक यांना धक्काबुक्की करत वर्दीवरील नेमप्लेट तोडून टाकली. याप्रकरणी दादाराव गोपाळ माने (वय 35, रा. दत्तनगर, दिघी), याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत दिनकर महाडिक यांनी भोसरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात पावसाचा ॲलर्ट

Maut Ka Kuan : स्टंटमॅनसारखं ‘मौत का कुआं’मध्ये धावतायत हे लोक, आयएएस अधिकाऱ्यानं शेअर केला Video

VIDEO : Nashik Corona | नाशकात बाजारपेठांमध्ये विनामास्क गर्दी, नागरिकांचा हलगर्जीपणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें