Army Recruitment Scams| आर्मी भरतीच्या घोटाळ्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ ची स्थापना ; आर्मी अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे पोहचणार

अटक केलेले तीन आरोपीतील आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. यातील डहाणे हा सैन्यदलात शिपाई तर आरोपी कदम हा ‘गवंडी’ म्हणून कार्यरत होता. आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत होता, असे समोर आले आहे

Army Recruitment Scams| आर्मी भरतीच्या घोटाळ्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ ची स्थापना ; आर्मी अधिकाऱ्यांपर्यंत धागेदोरे पोहचणार
प्रातिनिधीक फोटो

पिंपरी- लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी मागील काही दिवसापूर्वी  सांगवी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्या या टोळीमध्ये आर्मीमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग     असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करण्यसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

अशी केली होती फसवणूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून हजारो रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी गजानन पुरुषोत्तम मिसाळ (वय २३, जि. अमरावती) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सतीश कुंडलिक डहाणे (४० रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे ( जि. अकोला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्मी इंटेलिजन्सने याप्रकरणी तीन संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन आरोपी लष्करातून निवृत्त

या प्रकरणात अटक केलेले तीन आरोपीतील आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत. यातील डहाणे हा सैन्यदलात शिपाई तर आरोपी कदम हा ‘गवंडी’ म्हणून कार्यरत होता. आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत होता, असे समोर आले आहे. यात आणखी कोणाचा सभाग आहे, तसेच आणखी किती जणांची आरोपींनी फसवणूक केली आहे, याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच, यामध्ये ‘आर्मी’मधील बड्या अधिकाऱ्यांचा समोवश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्मी इंटेलिजन्सच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

यांचा ‘एसआयटी’ मध्ये समावेश

सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, अजय जोगदंड, डॉ. संजय तुंगार, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे यांचा एसआयटीत समावेश आहे.

लस घ्यायला गेला आणि कोरोना झाला असं होऊ नये म्हणून काय करावं? लसीकरण केंद्रावर काय काळजी घ्यावी?

Chandrakant Patil | राज्यात सगळा सत्यानाश सुरुय ; नवीन नियमावलीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला – चंद्रकांत पाटील

Bigg Boss Marathi Season 4 | बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कोणत्या महिन्यात येणार ? महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची माहिती

Published On - 12:22 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI