AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil | राज्यात सगळा सत्यानाश सुरुय ; नवीन नियमावलीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. राजेश टोपे जालन्यात एक बोलणार , अजित दादा शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार , यासगळ्या मध्ये कोरोनाला सिरिअसली घेऊ नका असे नाही, पण दुसऱ्या बाजूला घाबरवू पण नका.

Chandrakant Patil | राज्यात सगळा सत्यानाश सुरुय ; नवीन नियमावलीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 12:07 PM
Share

पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना सरकार जर मिनी  लॉकडाऊन सारखा निर्णय घेत असेल तर ते चालनार नाही. प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यांना तुम्ही काळजी घेण्यास सांगू शकता. राज्यात मनमानी कारभार सुरु आहे.कोरोनाबाबतच्या नियमावली बनावट असताना राज्य सरकारने विरोधकांना विचारात घेतले नाही. असा आरोप भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सर्वसामान्य माणूस  गोंधळलेला सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरु करता,  कधी बंद करता, कधी व्हर्च्युअल म्हणता , कधी परीक्षा व्हॅच्युअल म्हणता हा सगळा सत्यानाश चालला आहे. शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर तुम्हाला सत्यानाश सुरु आहे हे उत्तर देतील. राज्य सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. राजेश टोपे जालन्यात एक बोलणार , अजित दादा शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार , यासगळ्या मध्ये कोरोनाला सिरिअसली घेऊ नका असे नाही, पण दुसऱ्या बाजूला घाबरवू पण नका असे ते म्हणाले आहेत.

तज्ज्ञांना बोलू द्या कोरोना वाढत असताना एकही तज्ज्ञाला तुम्ही बी बोलू देत नाही. त्यांना बोलू द्या. त्यांनी सांगूद्या की बाबानो काळजी घ्या . काळजी करण्यासारख काही नाही परंतु काळजी घेण्यासारखं बरंच काही आहे. सदाभाऊ खोत, गोईपीचंद पडळकर हे आमचे रांगडे नेते आहेत. ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. सरकारला पोटापेक्षा नशेची जास्त पडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कोरोना हाय पिकला असताना यांनी दारूची होम डिलिव्हरी दिली . डिलिव्हरी द्यायचीच आहे तर ती पिझ्झाची द्या असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. पेट्रोल , डिझेल वरील व्हॅट कमी करायचा नाही, अन दारूवरचा करायचा. सरकारने विरोधी पक्षांना नाही किमान स्वतःचे चार नेते एकत्र बसवून एकमताने एका निर्णय घेतला पाहिजे मला गेंड्याची भाषा कळते थोडी, तोही भेटून मला म्हणाला अरे मी थोडा जास्त संवेदनशील आहे. तुम्ही आता दुसरा प्राणी शोधा कारण माझ्या पेक्षाही कमी संवेदनशील लोक आहेत. असा टोला सरकारला लगावला.

नाना पटोलेंवर कारवाई कधी महिलांच्या बाबातीत महाविकास आघाडी सरकारची प्रवृत्तीही माझा तो बळवंतराव दुसऱ्याचा तो बाब्या अशी आहे. त्यांनी महिलांना काही बोललं तरी चालत, पंतप्रधानांना काही म्हटलं तरी चालत मात्र भाजपच्या सोशल मीडियाच्या जितेन गजारिया यांच्या विरोधात मात्र यांनी वोरन्ट काढल. बरं काय म्हणाला तो राबडी देवी , ही काय शिवी आहे का? तो फुलन देवी नाही म्हणाला. राबडी देवी तो म्हणाला कारण खरच बिहारमध्ये मुख्यमंत्री त्या झाल्या जेव्हा लालू यादव यांना जेलमध्ये जावे लागले. त्याने केवळ उपमा दिली. तरी आम्ही त्याला समाज दिली. आपली संस्कृती ही महिलांबाबत योग्य शब्दात बोलण्याची आहे. पण त्याच्यावर केस दाखल झाली , मग नाना पटोलेंवर केस कधी दाखल होणार . आज आम्ही पुण्यात त्याच्या विरोधात केस दाखल करणार. पटोले यांनी पंतप्रधान नौटंकी म्हटले, गृहमंत्र्यांवर आरोप केले , त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार असा प्रश्नही त्यांची विचारला आहे.

Gold bonds | गोल्ड बाँड तुमच्यासाठी आहे फायद्याचे; या सहा कारणांनी करू शकता गुंतवणूक

Viral Video : मासे विकताना दिसली सुंदर मुलगी, यूझर्स म्हणतायत विश्वास नाही बसत!

ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चेंदामेंदा, भीषण अपघातात सहा जण जागीच ठार, आठ गंभीर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.