फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावरही गुन्हा, परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण गुंतागुंतीचं

फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावर देखील गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याप्रकरात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे. पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी ही घटना घडली होती.

फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावरही गुन्हा, परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण गुंतागुंतीचं
रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालात शैक्षणिक शुल्कावरुन वाद, विद्यार्थ्याने प्राचार्याच्या केबिनमध्ये स्वत:चं डोकं आपटलं

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये ख्यातनाम असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात एक धक्कादायक घटना समोर आली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने आधी प्राचार्यांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर संतापात केबिनच्या दरवाज्यावर डोकं आपटत स्वत:चं डोकं फोडून घेतलं. या विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. महाविद्यालयाच्या 40 ते 50 जणांनी मिळून आपल्याला प्रचंड मारहाण केल्याचा आरोप केला होता. आता फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावर देखील गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याप्रकरात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे.

फी माफीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेणाऱ्या विद्यार्थ्यावरही गुन्हा

पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले महाविद्यालयात बुधवारी ही घटना घडली होती. शुभम बारोठ या विद्यार्थ्यांचे फी वरून प्राचार्यांसोबत वाद सुरू होते. याच रागातून शुभमने स्वतःचे डोके दाराच्या काचेवर आपटले. यात त्याच्या डोक्याला इजा झाली. परंतु या घटनेत कर्मचारी देखील जखमी झाले, असा आरोप करत महाविद्यालयाने शुभमवर गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या दिवशी शुभमने महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला होता. आता सुरक्षा रक्षकानेही शुभमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं? विद्यार्थी म्हणतो…

संबंधित घटनेबद्दल शुभन बोराटेन प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत नेमकं काय-काय घडलं याबाबतची माहिती दिली. “गेल्यावेळी प्राचार्यांनी फी माफ करु असं सांगितलं होतं. तसेच मॅडमने देखील अर्ज लिहून द्या असं सांगितलं होतं. माझ्याकडे पैसे नव्हते. आईने गळ्यातील दागिने गहाण ठेवून पैसे आणले. त्यामुळे पैसे भरुन रिझल्ट घेण्यासाठी आणि अॅडमिशनसाठी आलो होतो. मी अर्जावरती प्राचार्यांची स्वाक्षरी घेऊन रिझल्ट घेऊन निघून जाणार होतो. आम्ही आतमध्ये गेलो. तेव्हा प्राचार्यांनी फी कमी होणार नाही, असं सांगितलं. याचा अर्थ जी फी सहा हजारावर आली होती ती थेट 13 हजारावर पोहोचली. एवढी फी आम्ही कुठून भरणार? पण आधी त्यांनी कमी फी सांगितली होती. त्यामुळे आम्ही कुठून भरणार? असं विचारलं. त्यावर त्यांनी संस्थेचे कारण देत फि भरावीच लागेल, असं सांगितलं. ते माझ्यावर रागावले. तुमचं शिक्षण बंद पडलं तर बंद. आम्हाला काही घेणंदेणं नाही, असं ते डायरेक्ट म्हणाले”, असं शुभमने सांगितलं.

“हे असे आण्णांचे विचार नाहीत. एखादा प्राचार्य विद्यार्थ्यांसोबत असं का वागू शकतो? मी एवढ्या तळमळीने इथपर्यंत आलो आहे. ते मला असं का बोलत आहेत? त्यामुळे मी त्यांना बोललो, ही गोष्ट तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर येऊन सांगा किंवा कॅमेऱ्यावर सांगा. त्यांनी माझा फोन बाहेर काढून घेतला. ते तेव्हा काहीच बोलले नाही. तोपर्यंत त्यांनी दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावून घेतल्यानंतर काय करतात ते मला माहिती आहे. पोलिसांना बोलवतात आणि विद्यार्थ्याला मारतात. हे मला माहिती होतं. या महाविद्यालयाचा मी जुना विद्यार्थी आहे. मी घाबरलो. त्यामुळे दरवाज्याला धडक दिली. त्यानंतर मला चक्कर येत होते. मी खुर्चीवर बसलो तर सर्व शिक्षकांनी येऊन मला मारहाण केली. जवळपास 35 ते 40 जणांनी मला मारहाण केली. मी सांगतोय मला श्वास घ्यायला त्रास होतोय. तरी मारहाण केली”, असा आरोप विद्यार्थ्याने केला.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

महाविद्यालय प्रशासनाची भूमिका काय?

महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत भूमिका मांडली. “संबंधित विद्यार्थ्याने मला फी माफ करा, असं सांगितलं. त्यावर मी त्यांना अरे बाळा असं सर्व फी माफ करता येणार नाही, असं सांगितलं. फक्त संस्थेला या भावना आम्ही कळवलेल्या आहेत. त्यांनी टप्प्याटप्प्याने फी घेण्यास सांगितलं आहे. फक्त एक परिपत्रक सरकार आणि विद्यापीठाचं आलं आहे. ते परिपत्रक पुढच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी आलं आहे. त्यामध्ये कोरोनाच्या काळात काही ठराविक फी घेऊ नये आणि उरलेली फी टप्प्याटप्प्याने घेण्यास सांगितलं आहे. संबंधित विद्यार्थ्याला तेच परिपत्रक मी दाखवलं. तसेच 2890 रुपये मी माझ्या अखत्यारितून माफ करतो, संस्थेला विनंती करतो. उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने भरावी, असं मी सांगितलं. पण विद्यार्थ्याने ते ऐकलं नाही. 50 टक्के फी विद्यार्थ्यांना माफ करु. पण 50 टक्के ऑडिट असतो. ती फी भरावी लागते. अन्यथा त्याला प्राचार्य जबाबदार असतो. ती फी प्राचार्यांच्या पगारातून वसूल केली जाते”, असं पांडुरंग गायकवाड यांनी सांगितलं.

“विद्यार्थ्याला ही भूमिका सांगितल्यानंतर त्याने काचेवर डोकं आपटलं. काच फोडली. त्यात शिपाई जखमी झाला आहे. त्याला दवाखान्यात दाखल केलं आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस त्या विद्यार्थ्याला घेऊन गेले. मी विद्यार्थींना केंद्रबिंदू मानतो. मी विद्यार्थी संघटनांचा आदर करतो. पण आज घडलेली घटना ती अत्यंत वाईट आहे. संबंधित विद्यार्थ्याने पळून जात असताना शिपाईला देखील मारहाण केली. दर शिपाईंनी त्याला मारहाण केली असेल तर शिपाईंवर आम्ही कारवाई करु. अजूनही आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूला आहे. त्याची 50 टक्के फी माफ करतो. त्याला जर बाहेर मारहाण झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं पांडुरंग गायकवाड म्हणाले.

हेही वाचा :

सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

मुंबईकरांना धडकी भरवणारी घटना, बोरिवलीत अभियंत्याच्या कारवर भरदिवसा गोळीबार, भयानक थरार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI