AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंबड्या झुंजवणं पडलं महागात, हातकडी पडली, थेट तुरूंगात… काय घडलं पुण्यात?

Pune Gambling: पुण्यातून जुगाराचा नवीन प्रकार समोर आला आहे. वानवडी परिसरात पैशांसाठी फायटर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या सहा जणांना पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे. कोंबड्यांना भिडवून त्यावर पैशांच्या बाज्या लावल्या जात होत्या. मात्र आता पोलिसांनी अशाप्रकारे जुगार खेळणाऱ्या 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

कोंबड्या झुंजवणं पडलं महागात, हातकडी पडली, थेट तुरूंगात... काय घडलं पुण्यात?
Hen Fighting
| Updated on: Oct 20, 2025 | 3:09 PM
Share

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. आता पुण्यातून जुगाराचा नवीन प्रकार समोर आला आहे. वानवडी परिसरात पैशांसाठी फायटर कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या सहा जणांना पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे. ही झुंज म्हणजे जुगाराचा एक प्रकार आहे. कोंबड्यांना भिडवून त्यावर पैशांच्या बाज्या लावल्या जात होत्या. मात्र आता पोलिसांनी अशाप्रकारे जुगार खेळणाऱ्या 6 जणांना बेड्या ठोकल्या आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

6 आरोपींना अटक

पुण्याच्या वानवडी परिसरात पैशांवर फायटर कोंबड्यांची झुंज लावली जात होती. याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी सर्व सहा आरोपी पोलिसांच्या हाती लागले. अमोल सदाशिव खुर्द (रा. रविवार पेठ), मंगेश आप्पा चव्हाण (रा. भवानी पेठ), निखिल मनिष त्रिभुवन (रा. घोरपडी), अमिर आयुब खान (रा. घोरपडीगाव), सचिन सदाशिव कांबळे (रा. भवानी पेठ) आणि प्रणेश गणेश पॅरम (रा. कॅम्प) या आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

5 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीसांनी वरील सर्व आरोपींकडून 6 रंगीत फायटर कोंबडे, त्यांना ने-आण करण्यासाठी वापरलेल्या सहा पिशव्या, तीन मोटारसायकली, पाच मोबाईल फोन आणि 2580 रुपयांची रोकड असा एकूण 5 लाख 11 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोंबड्यांना झुंजीसाठी वापरताना त्यांना क्रूरपणे वागवलं जात असल्याचंही पोलीसांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता आरोपींवर आणखी कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

पोलीसांकडून तपासाला सुरुवात

या कारवाईनंतर सर्व आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(ब) आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणारा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. हे आरोपी किती दिवसांपासून अशी झुंज लावत आहेत? इतर कोणत्या ठिकाणी असा प्रकार सुरू आहे का? हे कोंबडे कुठून आणले? या प्रश्नांची उत्तरे पोलीसांकडून शोधली जात आहेत. हा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.