Pimpri Chinchwad crime | पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

लग्नानंतर सासरच्या लोकांनी काळी बुटकी आहेस असे हिणवत तसेच लग्नात सोने कमी दिले म्हणून छळ सुरु केला. याबरोबरच पतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ दाखवून फिर्यादीशी अनैसर्गिक शरीर संबंध केले.

Pimpri Chinchwad crime |  पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
प्रातिनिधिक फोटो

पिंपरी – शहारातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचाराचा घटना ही वाढत आहे. पतीनं पत्नीला पॉर्न व्हिडीओ दाखवून पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित विवाहितेचे देवळाली कॅम्प, नाशिक येथे विवाह झाला होता . लग्नानंतर सासरच्या लोकांनी काळी बुटकी आहेस असे हिणवत तसेच लग्नात सोने कमी दिले म्हणून छळ सुरु केला. याबरोबरच पतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ दाखवून फिर्यादीशी अनैसर्गिक शरीर संबंध केले. पीडितेकडून हुंड्याची मागणी करून सातत्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. देवळाली कॅम्प, नाशिक येथे 28ऑगस्ट ते1 ऑक्टोबर2021 या कालावधीत हा प्रकार घडला. विवाहितेला सासू व नणंद यांनी डोक्याचे केस ओढत मारहाण केली. सातत्याने मानसिक छळ केला.

मानसिक व शाररीक छळ पीडितेला फिर्यादीला काळी बुटकी बोलून तसेच लग्नात सोने कमी दिले म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपी सासू व नणंद यांनी फिर्यादीच्या डोक्याचे केस ओढले व मारहाण केली. हुंड्याची मागणी करून आरोपींनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. फिर्यादीच्या पतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ दाखवून फिर्यादीशी अनैसर्गिक शरीर संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

5 राज्यांचा निवडणुकांचे वेळापत्रक दुपारी 3.30 वाजता जाहीर होणार, किती टप्प्यात निवडणूक असणार?

मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी

किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचा पलटवार

Published On - 3:39 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI