मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात 12 तारखेला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे, विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर ही सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी
मराठा आरक्षण आंदोलन

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती, त्यानंतर मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे, सर्वोच्च न्यायालयात 12 तारखेला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे, विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर ही सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या आशा पुन्हा पल्लवीत

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कसोटीने प्रयत्न सुरू आहेत, मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारसह मराठा समाजाच्या पदरी निराशा पडली होती, त्या आशा आता पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार आरक्षणासाठी जे काही करता येईल ते करावे, असेही पाटील म्हणाले आहेत.

आरक्षण का रद्द झाले?

नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं आणि आरक्षण रद्द केले होते, मात्र आता केंद्राच्या नव्या कायद्यानंतर स्थिती बदलल्याने याचिका दाखल करण्यात आल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. आणि याच याचिकेवर ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे यावेळी तरी मराठा समाजाला काही दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

50 टक्क्यांची, मर्यादा प्रवर्ग कसे ठरवले जाणार, या सर्व विषयावर राज्य सरकारने बाजू व्यवस्थित मांडावी, मराठा समजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जेजे करता येईल ते राज्य सरकारने जोमाने करावे, असे विनोद पाटील म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षावरून राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टात फेऱ्या सुरू आहेत, दोन्ही समाजाला न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.

Pimpri Chinchwad crime | पॉर्न व्हिडीओ दाखवत पतीने पत्नीवर केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Aurangabad: जि.प. शाळेतही निवडणुकीचं नाट्य! ऐनवेळी 16 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची पालकांची मागणी, काय घडला प्रकार?

किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचा पलटवार

Published On - 3:30 pm, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI