AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune TET : टीईटी घोटाळा प्रकरण : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट दिल्याची माहिती पुढे आली.

Pune TET : टीईटी घोटाळा प्रकरण : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
लवकरच मोठी नोकरभरती निघणारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 11:35 PM
Share

पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर(Sushil Khodavekar)चा अंतरिम जामीन अर्ज(Interim Bail Application) न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर खोडवेकर यांनी ॲड. एस. के. जैन व ॲड. अमोल डांगे यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला आहे. आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील जाधव यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि आरोपीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. (IAS officer Sushil Khodvekar’s interim bail application rejected by court)

सुशील खोडवेकर सध्या पोलीस कोठडीत

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर याला ठाण्यातून अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुशील खोडवेकर 2009 च्या बॅचचा आयएएस अधिकारी असून त्याने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून काम केलं आहे.

सुशीलच्या सांगण्यावरुन ब्लॅकलिस्ट कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले

टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट दिल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर सुशील खोडवेकरला अटक करण्यातआली.

बीडमधील 124 शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी होणार

राज्यातला टीईटी घोटाळा समोर आल्यानंतर पुणे पोलिसांची नजर आता बीड जिल्ह्यावर आहे. बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र पैसे देऊन आणल्याचा संशय आहे. त्यामुळे तब्बल 124 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांत धाकधूक वाढली आहे. (IAS officer Sushil Khodvekar’s interim bail application rejected by court)

इतर बातम्या

Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Malad Suicide : कर्जबाजारीपणामुळे मालाडमधील व्यावसायिकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये कर्जदारांची मागितली माफी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.