Pune Crime : पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

मयत कैदी समाधान सावंत याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाने तात्पुरत्या कारागृहात पाठवले होते. त्यानुसार त्याला टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये ठेवण्यात आले होते.

Pune Crime : पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 3:59 PM

पुणे : पोक्सो कायद्या अंतर्गत येरवडा तुरुंगात (Yerwada Jail) असलेल्या सोमवारी पहाटे एका कैद्याने तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. टॉवेलच्या साह्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान कांतीलाल सावंत (26) (Samadhan Kantilal Sawant) असे आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह त्याला ठेवण्यात आले होते. (Inmate commits suicide by hanging in Yerawada Jail in Pune)

मयत कैद्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता

मयत कैदी समाधान सावंत याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाने तात्पुरत्या कारागृहात पाठवले होते. त्यानुसार त्याला टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास त्याने कारागृहाच्या दरवाजाच्या गजाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दरम्या समाधानने आत्महत्या का केली ? याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करीत आहेत.

पालघरमध्ये सिगारेटवरुन वाद, दुकानदाराची हत्या

दुकान बंद झाल्याने सिगरेट न दिल्याच्या कारणावरुन टोळक्याने दुकानावर हल्ला करीत दुकानदाराची हत्या केल्याची घटना पालघरमधील बोईसरमध्ये घडली आहे. तर दुकानदाराच्या बचावासाठी मध्ये पडलेले तिघे जण गंभीर जखमी आहेत. विनोद सिंग असे हत्या झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना 7 जणांना ताब्यात घेतले आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोईसर पूर्व भागात वारांगडे गावात सतेंद्रकुमार याचे किराणामालाचे दुकान आहे. त्याच्यासोबत त्याचे रिक्षाचालक वडील विनोद सिंग हे काही महिन्यांपूर्वी राहायला आले होते. रात्री गावातील तीन ते चार तरुण किराणा मालाच्या दुकानाजवळ आले. त्यांनी सतेंद्रकुमार याच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र दुकान बंद झाल्याचं सांगत त्याने सिगरेट देण्यास नकार दिला. याच कारणातून या चौघांनी आपली टोळी घेऊन येत दुकानावर हल्ला करीत सिंग यांची हत्या केली. (Inmate commits suicide by hanging in Yerawada Jail in Pune)

इतर बातम्या

Nagpur Crime | नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये जुगाराचा डाव, पोलिसांच्या छाप्यात सापडलं काय?

Kolhapur Crime : कोल्हापूरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलाच्या कुटुंबियांवर हल्ला

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.