मुंबई : पोडियम पार्किंगच्या (podium parking space) दुसऱ्या मजल्यावरुन कार खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातातून 22 वर्षीय तरुणी आश्चर्यकारकरित्या बचावली. रविवारी सकाळी हा अपघात घडला होता. मुंबईतील मालाड भागात असलेल्या एका इमारतीच्या पोडियम पार्किंगमध्ये ही दुर्घटना (Mumbai Car Accident) घडली. अपेक्षा मिरानी ही तरुणी आपली कार दुसऱ्या मजल्यावर पार्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी अंदाज चुकल्याने तिच्या गाडीने वेग धरला आणि ती दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळली. यावेळी तिची गाडी पलटी झाली, तर ती कार खाली पडल्यामुळे खाली उभ्या असलेल्या वाहनाचाही अक्षरशः चुराडा झाला. मात्र 22 वर्षीय अपेक्षा या दुर्घटनेतून सुदैवाने बालंबाल बचावली. या धटनेमुळे पार्किंग करताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा व्यक्त होत आहे.