नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस

पतीने पत्नी माहेरी एकटी असल्याचं पाहून तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या डोक्यावरील लांबसडक केस कापले, पिंपरी पोलीस ठाण्यात अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस
पिंपरीमध्ये पतीने पत्नीचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला

पिंपरी चिंचवड : पती दारुसाठी वारंवार मारहाण करत असल्याच्या कारणाने पत्नी नांदायला येण्यास तयार नाही. त्यामुळे पत्नीला मारहाण करुन, तिला विद्रुप करण्याच्या उद्देशाने पतीने तिचे केस कापले. पुण्यात पिंपरी चिंचवड भागात ही अत्यंत विकृत घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीविरोधात पोलिसात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला.

नेमकं काय घडलं?

पिंपरी भागात राहणारी योगिता (नाव बदलले आहे) गेल्या दीड वर्षांपासून आपल्या आईकडे राहत आहे. पती दारु पिऊन वारंवार मारत असल्याच्या कारणावरून ती माहेरी आली होती. मात्र काल पती नरेंद्रने ती एकटी असल्याचं पाहून तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या डोक्यावरील लांबसडक केस कापले, अशी तक्रार तिने पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप

ही तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा योगिता पिंपरी पोलीस चौकीमध्ये गेली, तेव्हा तिला वेगळाच अनुभव आला. तिला चार ते पाच तास बसवून ठेवत तक्रार घेतली नसल्याचा आरोप तिने केला आहे. पोलीस चौकीमधील स्टाफ वाढदिवस साजरा करण्यात दंग होते, हीच घटना जर उच्चभ्रू घरातील मुलीसोबत घडली असती तर गंभीरपणे हाताळली गेली असती, असं शल्यही योगिताने बोलून दाखवलं.

ज्यावेळी योगिताने पिंपरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली कैफित मांडली, त्यावेळी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगितलं जातं.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

या घटनेबाबत पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस चौकीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात पाठवले आणि तिची बाजू ऐकून गुन्हा नोंद केल्याचं पिंपरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंपरी पोलीस चौकीमधील अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घातले.

संबंधित बातम्या :

प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं

ब्युटी पार्लरमध्ये केस कापण्याची हौस महागात, कोल्हापुरात मालकिणीसह दोन ग्राहकांवर गुन्हा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI