AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियकराच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न, प्रेयसीची दमदाटी, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक

संतोष पोटभरे याची प्रेयसी कविता दोडके ही तोतया महिला पोलीस कर्मचारी बनून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेली. पोलीस ठाण्यात बाळू पोटभरे यांचा शोध का घेत आहात, असा जाब पोलिसांना विचारु लागली

प्रियकराच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न, प्रेयसीची दमदाटी, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक
पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटकImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 8:41 AM
Share

पिंपरी चिंचवड : प्रियकराच्या भावाला वाचवण्यासाठी बनावट पोलीस कर्मचारी (Fake Police officer) बनलेल्या तरुणीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी (Pune Bhosari MIDC Police) पोलिसांकडून तोतया महिला पोलिसाला अटक करण्यात आली आहे. कविता प्रकाश दोडके असं महिला पोलीस असल्याचं खोटं सांगणाऱ्या तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी प्रियकर-प्रेयसी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल (Cheating) करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

कविताचा प्रियकर संतोष पोटभरे यांच्या भावा विरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आल्याची माहिती संतोष पोटभरे याला मिळाली.

तोतया महिला पोलिसाची धमकी

त्यानंतर संतोष पोटभरे याची प्रेयसी कविता दोडके ही तोतया महिला पोलीस कर्मचारी बनून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेली. पोलीस ठाण्यात बाळू पोटभरे यांचा शोध का घेत आहात, असा जाब पोलिसांना विचारु लागली. तुम्हाला तो अधिकार कुणी दिला, मी तुमची तक्रार वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करणार आणि तुम्हाला बघून घेते, अशी धमकीही कविताने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे.

ओळखपत्र मागताच उद्धटपणा

तोतया पोलीस कर्मचारी कविता दोडके हिला आपले ओळखपत्र मागितले असता तिने उद्धट वर्तन केले. मी मुंबई मधील मरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, असं तिने सांगितलं. तिच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी समजताच त्यांनी तिची अधिक चौकशी केली, ती तोतया असल्याची खात्री पटल्यावर तिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांची खाकी वर्दी आणि ओळखचिन्ह परिधान करून मी मुंबई पोलीस दलात नेमणुकीस आहे अशी बतावणी करून तोतयागिरी करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भादंवि कलम 353, 170, 171, 507, 34 याप्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर-प्रेयसी जोडगोळीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम करत आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.