AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने पुण्यात तरुणीची लाखोंना फसवणूक

संबंधित महिलेची ओळख अशाच एका मॅट्रिमोनियल साईटवर 40 वर्षीय व्यक्तीशी झाली. त्याने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम नेली.

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाच्या आमिषाने पुण्यात तरुणीची लाखोंना फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 11:28 AM
Share

पिंपरी चिंचवड : मॅट्रिमोनियल साईटवरुन विश्वास संपादन करुन जवळपास 50 महिलांना फसवणाऱ्या ठकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली असताना त्याच पद्धतीने चिखली परिसरात राहणाऱ्या आणखी एका महिलेला लुबाडले गेल्याची घटना समोर आली आहे. महिलेची पावणेदोन लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

संबंधित महिलेची ओळख अशाच एका मॅट्रिमोनियल साईटवर 40 वर्षीय व्यक्तीशी झाली. त्याने तिचा विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम नेली. त्यानंतर महिलेसोबत विवाह न करता तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण कालिदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पुण्यातील तरुणीची फसवणूक, चेन्नईतील आरोपीला अटक

दरम्यान, प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

भावी पतीच्या खात्यावर 11 लाख ट्रान्सफर

मी रेल्वे काँट्रॅक्टर आहे. लॉकडाऊन असल्याने कामगारांचे पैसे दिले नाहीत, तर रेल्वे कंत्राट रद्द करेल, असे त्याने खोटे सांगितले. त्याच्या थापांना भुलून तरुणीने आपल्या भावी पतीच्या बँक खात्यावर तब्बल 11 लाख 4 हजार 500 रुपये पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी लग्न करण्याचा बनाव रचला.

चेन्नईला बोलावून लग्नाचं नाटक

लग्नासाठी प्रेमराजने फिर्यादी तरुणीला चेन्नईला बोलावले. त्यामुळे तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत चेन्नईला गेली. तिथे त्याने आपला मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचे भासवून तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. त्यानंतर तरुणी पुण्याला परत आली.

80 लाखांचे वैयक्तिक कर्ज काढण्याची गळ

दहा बारा दिवसांनी आरोपीने तिला लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवले आणि 80 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून देण्याची मागणीही आरोपीने तरुणीकडे केली. तिने नकार देताच आरोपीने तिच्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने निगडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा तपास करताना निगडी पोलिसांना प्रेमराज थेवराज या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.

शंभरहून अधिक महिलांना जाळ्यात ओढले

त्यानंतर तरुणीने त्याला भेटायला बोलावले. आरोपी चेन्नईहून पुण्याला विमानाने आला. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पुणे विमाननगर परिसरात अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.