AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

५ लाख रुपये दया नाहीतर … , अल्पवयीन मुलीनं रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घटनाक्रम ऐकून पोलीस चक्रावले

नंबरवरून लोकेशनचा तपासत असताना संबंधित मुलगी पुणे ते छापरा या रेल्वेने जात असल्याची माहीती मिळाली. याचा माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक वेगाने चक्रे हालवली , त्यासाठी बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलिसांची मदार घेण्यात आली. त्यानंतर छापरा रेल्वे पोलिसांना मुलीला ताब्यात घेण्यास सांगितले.

५ लाख रुपये दया नाहीतर ... , अल्पवयीन मुलीनं रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घटनाक्रम ऐकून पोलीस चक्रावले
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 4:44 PM
Share

पुणे –शिक्रापूरमधील अल्पवयीन मुलीन स्वतःचं अपहरण झाल्याचं सांगत ५ लाखांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मुलीचा शोध सुरु असतानाच मुलीच्या भावाच्या मोबाईलवरती मेसेज आला. या मेसेजमध्ये ‘पाच लाख रुपये,  नाहीतर तिचे जीवाचे काही खरे नाही” असे लिहण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मेसेज मुलीच्या मोबाईलवरून आला होता.

आईने घेतली पोलिसात धाव खंडणीचा मेसेज पाहताच मुलीच्या आईने शिक्रापूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच घडलेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करण्यास सुरुवात केली. ज्या मोबाईलवरून मेसेज आला होता. त्या नंबरवरून लोकेशनचा तपासत असताना संबंधित मुलगी पुणे ते छापरा या रेल्वेने जात असल्याची माहीती मिळाली. याचा माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक वेगाने चक्रे हालवली , त्यासाठी बिहार राज्यातील छापरा रेल्वे पोलिसांची मदार घेण्यात आली. त्यानंतर छापरा रेल्वे पोलिसांना मुलीला ताब्यात घेण्यास सांगितले.

शिक्रापूर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अल्पवयीन मुलीची ओळख पटवत छापरा रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रमापूर पोलिसांनी मुलीला आपाल्या ताब्यात घेतले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी मुलीकड चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मोबाईलवरून पाच लाख खंडणीचा मेसेज स्वतः मुलीन पाठवला असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर खंडणीचा बनावही तिनेच रचल्याची माहिती दिली.

स्वतः रचला अपहरणाचा बनाव मुलीन हे सगळं का केलं याच उत्तर मात्र आद्यपही समोर आलेले नाही. चौकशीनंतर पोलिसांनी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकरणाची तपासणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीत, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांचेसह पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,पोलीस नाईक विकास पाटील, पो.ना. किरण निकम यांने केली आहे.

हे ही वाचा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार पुण्यात सरकारची डोकेदुखी वाढली, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचेही ‘भीक मागो’ आंदोलन

पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपने 14 जागा जिंकल्या, काँग्रेसचा पराभव, शिवसेना-राष्ट्रवादीही विजयी

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.