दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

परीक्षा दिलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. तसा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार
प्रातिनिधिक फोटो

पुणे : परीक्षा दिलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. तसा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षा शुल्क परताव्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिपत्रक काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.

बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट

नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

MPSC Exam Update: वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून मिळणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

CBSE Admit Card 2021: सीबीएसईकडून दहावी बारावीच्या पहिल्या टर्म परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

Published On - 10:39 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI