बंदूक हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवला, पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाकडून 25 वर्षीय भाईला बेड्या

बंदूक हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवणं 25 वर्षीय भाईला चांगलंच महागात पडलंय.  कोयता भाई नंतर पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आणखी दोन भाईंना अटक केलीय.

बंदूक हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवला, पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाकडून 25 वर्षीय भाईला बेड्या
हातात बंदूक घेऊन फोटो काढणाऱ्या आणि व्हॉट्स अॅप स्टेस ठेवणाऱ्या भाईला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात...
रणजीत जाधव

| Edited By: Akshay Adhav

Jul 28, 2021 | 3:13 PM

पिंपरी चिंचवड : बंदूक हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेवणं 25 वर्षीय भाईला चांगलंच महागात पडलंय.  कोयता भाई नंतर पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आणखी दोन भाईंना अटक केलीय. देशी बनावटीची बेकायदा बंदूक बाळगत व्हाट्सअॅप वर स्टेटस ठेवणे या भाईला चांगलंच महागात पडलंय.

आरशान शेख असं या 25 वर्षीय भाईचं नाव आहे. त्याचा साथीदार उमेर शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.आरशान शेख याने बंदूक हातात घेत काढलेला व्हिडिओ व्हाट्सअॅपला स्टेटस ठेवला होता. त्यावरुन पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीची बंदूक आढळून आली. त्यानंतर पिंपरी चिंचवड गुंडाविरोधी पथकाने त्यांना अटक केली.

कोयता भाईची दहशत, पोलिसांनी हिसका दाखवला

कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता भाई राकेश सरोदे उर्फ यम भाईची पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात वरातच काढली आहे. आरोपीने ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी त्याची वरात काढली.

या यम भाईने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असं तो व्हिडीओत म्हणाला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

(pimpari Chinchwad police nabbed A Bhai Who took Vieo With handgun in a hand)


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें