Pimpri Chinchwad Crime : ‘गरोदर होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देतो’ म्हणत महिलेवर वारंवार बलात्कार! भोसरी पोलीसात तक्रार

पीडित 25 वर्षीय महिलेनं बलात्कार प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pimpri Chinchwad Crime : 'गरोदर होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देतो' म्हणत महिलेवर वारंवार बलात्कार! भोसरी पोलीसात तक्रार
गोळ्या देतो सांगून बलात्कार...
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत

|

Jul 20, 2022 | 8:32 AM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime News) पोलिसांनी सोमवारी बलात्कार प्रकरणी (Rape Complaint) एक तक्रार नोंदवून घेतली. या तक्रारी महिलेनं खळबळजनक आरोप एका 50 वर्षीय पुरुषावर केलाय. एका पुरुषाने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. या पीडितीचे वय 25 वर्ष असून तिने बलात्काराप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांत सविस्तर जबाब नोंदवला. सध्या पोलिसांकडून (Bhosari Police) या संपूर्ण प्रकरणी तपास केला जातो आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, असा सनसनाटी आरोप महिलेनं तक्रारीत केलाय. आधी औषधं देऊन या महिलेची शुद्ध हरपली होती. त्यानंतर संशयित आरोपी पुरुषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा बलात्कार केला, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडितेचे अश्लिल फोटो आपल्याकडे आहेत, असं म्हणत तिला ब्लॅकमेल करत शरीर सुखाची मागणीही आरोपीनं केल्याचं पीडितेनं म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस ठाण्यात पीडित 25 वर्षीय महिलेनं बलात्कार प्रकरणी तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत या महिलेनं आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप एका पुरुषावर केलाय. तसंच अश्लिल फोटोंची भीती दाखवत सतत आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचंही म्हटलंय.

गरोदर होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या

तक्रारदार महिलेनं म्हटलंय, की या पुरुषानं आपल्याला आयुर्वेदिक गोळ्या देत असल्याची बतावणी केली होती. या आयुर्वेदिक गोळ्यांमुळे गरोदर होण्यासाठी मदत होईल, असं म्हटलं होतं. या गोळ्यांसाठी तब्बल 90 हजार रुपये इतकी किंमतही आपण मोजल्याचं पीडितेनं म्हटलंय. दरम्यान, एक दिवस हा माणून गोळ्या घेऊन भोसरीतील आपल्या घरी आला.

गैरफायदा घेत बलात्कार

या गोळ्या घेतल्यानंतर पीडितेला कोणतीही शुद्ध राहिली होती. त्यानंतर पुरुषाचा या गैरफायदा घेत आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं माझ्या लक्षात आल्याचं पीडितेनं म्हटलंय. मी बेशुद्ध झाल्यावर माझ्यावर बलात्कार करण्यात आला, असा आरोप या पीडितेनं केला आहे. तसंच त्याने माझे आक्षेपार्ह अवस्थेत फोटोही काढले, असंही पीडितेनं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या फोटोंची भीती घालून माझ्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार करण्यात आला, असाही आरोप पीडितेनं केला असून आता हे संपूर्ण प्रकरण भोसली पोलिसांकडे देण्यात आलंय. भोसरी पोलीस ठाण्यातील सबइन्स्पेक्टर गोविंद पवार यांनी याबाबतची माहिती दिली असून पुढील तपास केला जातोय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें