बॅंकेत नोकरी करतो सांगून महागड्या दुचाकी चोरायचा, बारामती तालुका पोलिसांनी केला भांडाफोड

बारामती एमआयडीसीसह सुभद्रा मॉल आणि अन्य परिसरातून महागड्या दुचाकींच्या चोरीचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले होते. त्यामुळे बारामती तालुका पोलिसांनी या चोरीबाबत तपास सुरु केला होता. या दरम्यान, इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील तेजस कदम हा बारामतीतील सुभद्रा मॉल परिसरातील पार्किंगमध्ये संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले.

बॅंकेत नोकरी करतो सांगून महागड्या दुचाकी चोरायचा, बारामती तालुका पोलिसांनी केला भांडाफोड
बॅंकेत नोकरी करतो सांगून महागड्या दुचाकी चोरायचाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:44 AM

बारामती : बारामती एमआयडीसी भागातील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पिटल या ठिकाणाहून महागड्या दुचाकींची चोरी (Theft) करणाऱ्या ठकाला बारामती तालुका पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. तेजस कदम असं या आरोपीचं नाव असून तो स्वतः बॅंकेत कामाला असल्याचं घरात आणि परिसरात सांगत होता. प्रत्यक्षात मात्र त्यानं मोठ्या प्रमाणात दुचाकींची चोरी केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून बुलेट, यमाहा, हिरो होंडा युनिकॉर्न आणि एफ झेड आदि तब्बल 9 लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात केल्या आहेत. आरोपीविरोधात भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. (Police arrested a thief for stealing a two wheeler in Baramati)

पार्किंगमधील महागड्या दुचाकी चोरायचा

बारामती एमआयडीसीसह सुभद्रा मॉल आणि अन्य परिसरातून महागड्या दुचाकींच्या चोरीचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले होते. त्यामुळे बारामती तालुका पोलिसांनी या चोरीबाबत तपास सुरु केला होता. या दरम्यान, इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील तेजस कदम हा बारामतीतील सुभद्रा मॉल परिसरातील पार्किंगमध्ये संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यावरून त्याची उलटतपासणी केली असता तो महागड्या दुचाकींची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करुन त्याची चौकशी केली असता त्याने बारामतीसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही दुचाकींची होरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पोलिसांनी बुलेट, यामाहा, हिरो होंडा युनिकॉर्न आणि एफ झेड आदि आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक रणजित मुळीक, अमोल नरुटे, कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, दत्ता मदने आणि नितीन कांबळे यांनी ही कारवाई केली.(Police arrested a thief for stealing a two wheeler in Baramati)

इतर बातम्या

संजय बियाणी हत्याकांडांची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार

Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा आणखी एका बिगर कश्मीरीवर हल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.