Pune Crime : दौंडमध्ये ऑनलाइन कसिनोवर पोलिसांची कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणांना आकर्षित करणाऱ्या ऑनलाइन कसिनो खेळणाऱ्या तरूणांना जाळ्यात अडकवले जाते. त्यानंतर मोबाईलवर हजारो लाखो रूपये घेऊन पैशांच्या बदल्यात मोबाईलवर पॉईंट्स पाठवले जातात. तरुण कसिनो खेळून पॉईंट्स हरल्यानंतर आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

Pune Crime : दौंडमध्ये ऑनलाइन कसिनोवर पोलिसांची कारवाई, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दौंडमध्ये ऑनलाइन कसिनोवर पोलिसांची कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:00 PM

पुणे : दौंड शहरामध्ये मोबाईलवर सुरु असलेल्या ऑनलाईन कसिनो (Casino)वर धाड टाकत पोलिसांनी सहा जणांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दौंड शहर पोलिसांनी 24 जणांवर कारवाई (Action) केली आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कसिनोवर धाड (Raid) टाकत धडक कारवाई केली आहे. मोबाईलवर लाखो रुपये लावून हा कॅसिनो खेळला जातो. यातून आत्महत्येसारख्या घटनाही घडतात. यामुळेच पोलिसांनी आता या कॅसिनोविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दौंड शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ऑनलाइन कसिनो चालवणाऱ्या सहा जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर पैशाच्या बदल्यात पॉईंट्स पाठवले जातात

तरुणांना आकर्षित करणाऱ्या ऑनलाइन कसिनो खेळणाऱ्या तरूणांना जाळ्यात अडकवले जाते. त्यानंतर मोबाईलवर हजारो लाखो रूपये घेऊन पैशांच्या बदल्यात मोबाईलवर पॉईंट्स पाठवले जातात. तरुण कसिनो खेळून पॉईंट्स हरल्यानंतर आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन कसिनोवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी या कॅसिनो विरोधात कारवाईची पावले उचलली आहेत. हा ऑनलाईन कसिनो पोलिसांच्या देखील नियंत्रणाबाहेर गेला आहे.

सिंधुदुर्गात अवैध दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा पटेलवाडी येथे गावच्या हद्दीत एका काजू फॅक्टरीच्या समोरील बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारुसाठा ठेवण्यात आला होता. हा अवैध मद्याचा साठा छापा टाकून जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, छापा टाकून मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यामध्ये कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विविध ब्रॅन्डच्या 180 मिलीच्या 9696 सिलबंद काचेच्या बाटल्या व 750 मिलीच्या 1008 सिलबंद प्लॅस्टिक बाटल्या असे एकूण 286 बॉक्स मिळून आले. एकूण 20,21,760 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.