AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sorry Mom! पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास, सुसाईड नोट सापडली

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ “सॉरी मॉम” (Sorry Mom) असे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. (Pune Bhor Police constable Razzak Muhammad Maneri Committed hang himself suicide […]

Sorry Mom! पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास, सुसाईड नोट सापडली
Bhor Police constable
| Updated on: Jun 22, 2021 | 5:02 PM
Share

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ “सॉरी मॉम” (Sorry Mom) असे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. (Pune Bhor Police constable Razzak Muhammad Maneri Committed hang himself suicide note found)

मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते.

मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी थेट तो राहत असलेले ठिकाण गाठले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

सुसाईड नोट सापडली

यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांना मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली. यात रज्जाकने सॉरी मॉम असे लिहिले होते. तसेच रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी नसही कापून घेतली होती. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवनप्रवास संपवला.

तपास सुरु

दरम्यान सध्या या घटनेचा संपूर्ण तपास सुरु आहे. मात्र रज्जाक मणेरी या तरुण पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

इतर बातम्या

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट

डोंबिवलीच्या तरुणाकडून जयपूरच्या बिझनेसमनची सुपारी, एकतर्फी प्रेमातून गोळीबार

(Pune Bhor Police constable Razzak Muhammad Maneri Committed hang himself suicide note found)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.