AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजेंविषयी अपशब्द काढणाऱ्या उद्योजकाची धिंड, पुण्यातून शिवधर्म फाऊंडेशनच्या सात कार्यकर्त्यांना अटक

इंदापूर शहरात हायवेवर उद्योजक अशोक जिंदाल यांची गाडी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. त्यानंतर त्यांची धिंड काढत त्यांना पोलिस ठाण्यात नेलं होतं.

उदयनराजेंविषयी अपशब्द काढणाऱ्या उद्योजकाची धिंड, पुण्यातून शिवधर्म फाऊंडेशनच्या सात कार्यकर्त्यांना अटक
उदयनराजेंबाबत अपशब्द काढल्याबद्दल एका उद्योजकाची धिंड
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 4:11 PM
Share

इंदापूर : भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्‍द काढल्याबद्दल उद्योजकाच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून शिवधर्म फाऊंडेशनच्या सात सदस्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इंदापूर शहरात हायवेवर अशोक जिंदाल यांची गाडी अडवून त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. (Pune Indapur Shiv Dharma foundation activists arrested for  assaulting Industrialist Ashok Jindal who used offensive language for MP Udayanraje Bhosale)

काय आहे व्हिडीओ?

अशोक जिंदाल हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीतील एका प्रायव्हेट कंपनीचे मालक आहेत. जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्‍द वापरल्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते उदयनराजे यांचा साताऱ्यातील एक गुंड असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे.

शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्य़कर्त्यांचा राडा

जिंदाल यांच्या व्हिडीओच्या निषेधार्थ निषेधार्थ काल (गुरुवारी) सायंकाळी इंदापूर शहरात हायवेवर जिंदाल यांची गाडी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडवली. जिंदाल यांच्या तोंडाला काळं फासत, त्यांची धिंड काढत त्यांना पोलिस ठाण्यात आणलं होतं. उदयनराजे यांच्याविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. या प्रकारानंतर इंदापूरमध्ये काही वेळ तणावाचे वातावरण होते.

धिंड काढणाऱ्यांवर गुन्हा

पोलिसांनी आता यात स्वत: फिर्यादी होत बेकायदेशीर जमाव जमवणे, कोरोना महामारीत तोंडाला मास्‍क न लावणे, कोरोना काळातील जिल्‍हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, मारहाण केल्याच्या कारणातून शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

उदयनराजे समर्थकांची दादागिरी, उदयनराजेंना गुंड संबोधणाऱ्या उद्योजकाला काळं फासलं, कपडेही फाडले

Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच

(Pune Indapur Shiv Dharma foundation activists arrested for  assaulting Industrialist Ashok Jindal who used offensive language for MP Udayanraje Bhosale)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.