Breaking : उदयनराजे समर्थकांची दादागिरी, उदयनराजेंना गुंड संबोधणाऱ्या उद्योजकाला काळं फासलं, कपडेही फाडले

इंदापुरातील एका उद्योजकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना पाहायला मिळत आहे. त्यावरुन शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं, त्याचे कपडे फाडले आणि त्यांची धिंडही काढली.

Breaking : उदयनराजे समर्थकांची दादागिरी, उदयनराजेंना गुंड संबोधणाऱ्या उद्योजकाला काळं फासलं, कपडेही फाडले
उदयनराजेंबाबत अपशब्द काढल्याबद्दल एका उद्योजकाची धिंड
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 11:18 PM

राहुल ढवळे, टीव्ही 9 मराठी, इंदापूर : छत्रपची शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची दादागिरी इंदापुरात पाहायला मिळाली आहे. उदयनराजेंना गुंड संबोधणाऱ्या एका उद्योजकाला त्यांच्या समर्थकांनी काळं फासल्याची घटना इंदापूर घडलीय. अशोक जिंदाल असं या उद्योजकाचं नाव आहे. इंदापूर एमआयडीसीमध्ये त्याची एक कंपनी आहे. या उद्योजकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना पाहायला मिळत आहे. त्यावरुन शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं, त्याचे कपडे फाडले आणि त्यांची धिंडही काढली. त्यानंतर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला पोलीस ठाण्यात घेऊन जात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (shivdharma foundation activists lash out an industrialist for using offensive language against udayanraje bhosale)

अशोक जिंदाल नावाच्या उद्योजकाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो उद्योजक उदयनराजे यांचा साताऱ्यातील एक गुंड असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. यावरुन उदयनराजेंच्या समर्थकांनी इंदापुरातील या उद्योजकाला काळं फासलं, भर रस्त्यात त्याचे कपडे फाडले, तसंच त्या उद्योजकाची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. उदयनराजेंना गुंड संबोधल्यामुळे या उद्योजकावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांच्या समर्थकांनी केलीय.

मराठा आरक्षणावरुन उदयनराजे आक्रमक

पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची 14 जून रोजी पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

पाच बोटं एकसारखे नसतात, सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत, सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवलं जात आहे. पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा. सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला सुनावलं.

इतर बातम्या :

‘मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला जनता भीक घालणार नाही’, आमदार सुरेश धसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर

shivdharma foundation activists lash out an industrialist for using offensive language against udayanraje bhosale

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.