‘मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला जनता भीक घालणार नाही’, आमदार सुरेश धसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

शिवसेनेला लोकशाही मान्य नाही, ठोकशाहीचा नवीन अवतार शिवसेनेने दाखवायला सुरुवात केली आहे. याचीच प्रचिती औरंगाबाद आणि बीडमधील 2 घटनांतून दिसून आली आहे, अशी टीका सुरेश धस यांनी केलीय.

'मराठवाड्यात शिवसेना क्षीण, ठोकशाहीला जनता भीक घालणार नाही', आमदार सुरेश धसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
भाजप आमदार सुरेश धस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संतोष जाधव

| Edited By: सागर जोशी

Jun 24, 2021 | 10:25 PM

उस्मानाबाद : औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे स्वत: या बैठकीत हजर होते. मात्र, काही शिवसैनिकांनी आरडाओरड, गोंधळ घातल ही बैठक बंद पाडली. अखेर या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं. या मुद्द्यावरुन भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. शिवसेनेला लोकशाही मान्य नाही, ठोकशाहीचा नवीन अवतार शिवसेनेने दाखवायला सुरुवात केली आहे. याचीच प्रचिती औरंगाबाद आणि बीडमधील 2 घटनांतून दिसून आली आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. शिवसेनेची मूळ तत्व काय आहेत हे त्यानी समजून घेण्याची गरज असल्याचा टोला सुरेश धस यांनी शिवसेना नेत्यांना लगावलाय. (Suresh Dhas criticizes Shiv Sena over controversy in Vinayak Mete’s meeting)

औरंगाबादेत मराठा आरक्षणबाबत भुमिका ठरवण्यासाठी विनायक मेटे यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून आयोजीत केलेली बैठक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. दुसऱ्या संघटनांचे कार्यक्रम जाऊन बंद पाडणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या कुठल्या नियमात बसतं? असा सवाल सुरेशही सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्या पदाधिकारी निवडीच्या अंतर्गत वादातून भर रस्त्यावर हाणामारी झाली. त्यावरुन टोला लगावताना शिवसेनेचं दुसऱ्यांबाबत ठोकशाहीचं धोरण आणि आपल्या पक्षातही ठोकशाहीचं धोरण आहे. मुळात मराठवाड्यात शिवसेना क्षीण झाली आहे. त्यामुळे नव्यानं उभारी मिळवण्याचं काम ठोकशाहीच्या माध्यमातून सुरू आहे, अशी घणाघाती टीका धस यांनी केलीय.

औरंगाबादेत नेमकं काय घडलं?

औरंगाबाद येथील पडेगाव येथे शिवसंग्रामची आज (24 जून) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे हे देखील उपस्थित होते. शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, बैठक सुरु असताना अचानक तिथे काही शिवसैनिक दाखल झाले. त्यांनी प्रचंड गोंधळ घालत बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत शिवसैनिकांनी बैठकीत गोंधळ घातला.

‘ही सरकारी गुंडगिरी’

“मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्यावतीने आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही येत्या 26 जानेवारी रोजी मेळावा आयोजित केला आहे. यासाठी आम्ही पडेगाव येथे एका बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीत काही गावगुंडांनी येऊन गुंडगिरी सुरू केली. आमच्या बैठकीत मारामारी सुद्धा केली. ते गावगुंड सरकारी पक्षाचे होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते काम करत होते. पूर्वनियोजितपणे आमची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आमच्या शहराअध्यक्ष यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे”, असं विनायक मेटे म्हणाले.

‘मराठा समाज ना मुघलांना घाबरला ना इंग्रजांना’

“या राज्यातला मराठा समाज ना मुघलांना ना इंग्रजांना घाबरला. मराठ्यांना घाबरवण्याची औकात कुणातही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पक्षात गुंड ठेऊन मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर मराठा समाज उसळी मारल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

संबंधित बातम्या :

‘आम्ही गप्प याचा अर्थ हातात बांगड्या भरल्या नाहीत’, शिवसैनिकांनी सभा उधळल्यानंतर विनायक मेटे आक्रमक

औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली

Suresh Dhas criticizes Shiv Sena over controversy in Vinayak Mete’s meeting

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें