कामगार महिलेला डोंगरावर नेत तिच्यासोबत भयावह कृत्य, पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या

महिलेला काम देतो असं सांगत तिला फसणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या कर्नाटकातल्या गावात जावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कामगार महिलेला डोंगरावर नेत तिच्यासोबत भयावह कृत्य, पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या
प्रातिनिधीक फोटो

पुणे : महिलेला काम देतो असं सांगत तिला फसणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या कर्नाटकातल्या गावात जावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीवरुन या गुन्ह्याचा खुलासा करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं श्रीनिवास गणेश जाधव असं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही 1 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपीने पीडित महिलेला गवत कापण्याचं काम देतो असं सांगत तिला कानिफनाथ डोंगर परिसरात नेलं होतं. तिथे परिसरात फारशी वर्दळ नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने महिलेला थेट दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेला मारहाण करत तिच्या अंगावरील दागिने हिसकावले. त्यानंतर तो तिथून पळून गेला. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार

पीडित महिला ही आरोपीने केलेल्या मारहाणीत जखमी झाली होती. महिलेने जखमी अवस्थेतच कोंढवा पोलीस ठाणे गाठलं. तिथे महिलेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ते फुटेज महिलेला दाखवले. महिलेने आरोपीचं केलेल्या वर्णनाच्या आधारावर त्यांना एका व्यक्तीवर संशय आला. पोलिसांनी महिलेला संबंधित सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती दाखवला. त्यानंतर महिलेने सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीच आरोपी असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

आरोपीला अखेर कर्नाटकातून बेड्या

पोलिसांनी केलेल्या तपासात सीसीटीव्हीत दिसलेल्या संशयित आरोपीचं नाव श्रीनिवास गणेश जाधव असल्याचं निषपन्न झालं. हा आरोपी पुण्यातील जगताप नगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पण तिथे गेल्यावर त्याचा पत्ताच लागला नाही. अखेर पोलिसांना आरोपी नेमका कुठला, त्याचं नाव-गाव काय त्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या थेट कर्नाटकातील गावात सापळा रचला. तिथे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने अशाप्रकारे आणखी किती महिलांना लुटलंय? याचाही तपास पोलीस करत आहेत.

कल्याणमध्ये सराईत मोबाईल चोरट्याला बेड्या

दुसरीकडे कल्याणमध्ये दिवसाढवळ्या रस्त्याने पायी जात असलेल्या नागरिकांना लुटणाऱ्या रिक्षा चालक लुटारुला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. सुफियान बागवान असे या लूटारुचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 31 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. या आरोपीचा चोरीसाठी चांगलाच हात बसला होता. तो सर्वसामान्यांवर दादागिरी करुन त्यांच्या हातातून मोबाईल हिसकवायचा. विशेष म्हणजे त्याचा प्रताप कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर अनेकांकडून या प्रकरणावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. आरोपी चोरटे भर दिवसा अशा प्रकारे हैदोस घालत असतील तर त्यांना खरंच पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी चर्चा परिसरात सुरु होती. अखेर पोलिसांनी या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा :

शिक्षिकेच्या पोरीची प्रियकरासह घरातच चोरी, 42 लाखांवर डल्ला, 99 तोळे सोनेही लंपास

Aurangabad crime: पानदरीबा भागात धाडसी चोरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांचे साहित्य लंपास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI