AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षिकेच्या पोरीची प्रियकरासह घरातच चोरी, 42 लाखांवर डल्ला, 99 तोळे सोनेही लंपास

हिमानीने कपाटातील साहित्य विखुरले, तिजोरी उघडली आणि तिजोरीचे कुलूप तोडले, जेणेकरून असे वाटेल की घरात चोरी झाली आहे. हे सर्व केल्यानंतर हिमानी शांतपणे आईकडे परत आली.

शिक्षिकेच्या पोरीची प्रियकरासह घरातच चोरी, 42 लाखांवर डल्ला, 99 तोळे सोनेही लंपास
राजस्थानात चोरी
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 3:53 PM
Share

जयपूर : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील गोटण येथील एका शिक्षिकेच्या घरातून 90 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. दोघांनाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. आरोपी तरुणाकडून 37 लाख 95 हजार 800 रुपये रोख आणि 99 तोळे सोनेही जप्त करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

शिक्षिका कांतादेवी फडौदा (Kantadevi Fadoda) यांची मुलगी हिमानी फडौदाला तिचा प्रियकर सुनील जाट याच्याशी लग्न करायचे होते, पण सुनीलच्या आईचे माहेरचे गोत्र आणि तिचे गोत्र एक असल्यामुळे कुटुंब त्यांच्या लग्नाला विरोध करत होते. मात्र दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. दोघांनी नवीन आयुष्य सेटल करण्याच्या उद्देशाने चोरी केली.

वडिलांच्या निधनानंतर 42 लाख 

हिमानी फडौदा (Himani Fadoda) हिचे वडील नथुराम फडौदा लेक्चरर होते. एक वर्षापूर्वी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या सेवा योजनेच्या बदल्यात कुटुंबाला मिळालेले 42 लाख रुपये घरात ठेवले होते. यासोबतच 99 तोळे सोन्याचे दागिनेही घराच्या तिजोरीत ठेवले होते.

प्रियकराचा सोने-पैशांवर डल्ला

15 सप्टेंबर रोजी हिमानीची आई कांतादेवी सकाळी शाळेत गेली होती. भाऊ हेमंत परीक्षेसाठी, तर वहिनी कविता देखील बाहेर होती. सुनियोजित कटानुसार हिमानीने आपला प्रियकर सुनील (23 वर्ष) याला घरी बोलावले. त्यांनी तिजोरीत ठेवलेले 42 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले. यानंतर हिमानीचा बॉयफ्रेंड सुनील सगळं सामान घेऊन घर सोडून निघून गेला.

घरात चोरी झाल्याचा बनाव

जेव्हा आई कांतादेवी शाळेतून घरी परतली, तेव्हा हिमानी काहीच न झाल्याप्रमाणे वावरत होती. संध्याकाळी उशिरा ती आईला घराजवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये फिरायला घेऊन गेली. यानंतर, हिमानीने कपाटातील साहित्य विखुरले, तिजोरी उघडली आणि तिजोरीचे कुलूप तोडले, जेणेकरून असे वाटेल की घरात चोरी झाली आहे.

हे सर्व केल्यानंतर हिमानी शांतपणे आईकडे परत आली. जेव्हा आई आणि मुलगी घरी पोहचल्या, तेव्हा चोरीच्या घटनेवरून एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हिमानीचा बनाव उघडकीस आला. दोघांनाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.