VIDEO | पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या दुचाकीवर कारवाई, पुणे ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार

पुण्यात संबंधित महिला दुचाकीस्वार पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती. ती आपल्या स्कूटरवर बसलेली असतानाच तिच्यावर कारवाई करण्यात येत होती. यावेळी या प्रकाराचा व्हिडीओ शूट करण्यात आला

VIDEO | पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या दुचाकीवर कारवाई, पुणे ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार
पुण्यात महिला दुचाकीस्वारावर वाहतूक पोलिसाची कारवाई


पुणे : पुणे वाहतूक पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या स्कूटरवर कारवाई करण्यात येत होती. मात्र व्हिडीओ शूट करत असल्याचं पाहून पोलिसाने काढता पाय घेतला.

काय आहे प्रकरण?

पुण्यात संबंधित महिला दुचाकीस्वार पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबली होती. ती आपल्या स्कूटरवर बसलेली असतानाच तिच्यावर कारवाई करण्यात येत होती. एका पत्रकाराने या प्रकाराचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली. अखेर व्हिडीओ काढत असल्याचे पाहून कारवाई न करता ट्रॅफिक पोलीस निघून गेले.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात वाहतूक पोलिसांचा अजब कारभार यापूर्वीही

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर जोरदार टीका झाली होती.

नो पार्किंगमध्ये बाईक उभी केल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे आली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी तिथे दाखल झाले. यावेळी बाईकस्वार आपल्या बाईकवर बसून राहिला. मात्र पोलिसांनी उद्दामपणा करत त्याला बाईकसह उचलून टोईंग व्हॅनमध्ये ठेवल्याचं समोर आलं होतं. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

पुणेकरांचा संताप

ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला गेला.  वाहनचालक जरी चुकत असेल, तरी अशा पद्धतीने वाहतूक पोलिसाने कारवाई करणं, कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. वाहन उचलणं ठीक, पण वाहनासह चालकालाही उचललं जाण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत पुणेकरांनी व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या :

पुण्यात वाहतूक पोलिसांचा उद्दामपणा, दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टेम्पोत भरलं

दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत ‘हे’ आदेश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI