Pune crime | ‘या’ गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्‍हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक

Pune crime | 'या' गुन्हयांतर्गत अंर्तगत रवींद्र बर्‍हाटेला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक
प्रातिनिधीक फोटो

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडून सुरू होता. घरफोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसह संबंधित घरफोडीच्या घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 06, 2022 | 5:19 PM

पुणे – चतु:श्रृंगी पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला आज मोक्का गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 11  जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातून बर्‍हाटे याला ताब्यात घेण्यात आले असून पुण्यात आणण्यात आले. मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

फसवणुकीचे गुन्हे दाखल माहिती अधिकारकार कार्यकर्ता असल्याच्य नावाखाली पुणे शहरात विविध गुन्हे दाखल आहेत. रवींद्र बर्‍हाटे याच्याविरुद्ध खंडणीसह फसवणूक प्रकरणी 17  हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बर्‍हाटेवर कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो सुमारे दीड वर्ष फरार होता. 6 जुलै 2021  रोजी गुन्हे शाखेने त्याला हडपसर पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आता चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

सराईत गुन्हेगारास अटक ; 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त शहराच्या वेगवेगळ्या भागात बंद घरांची पाहणी करून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून घरफोडीच्या 30 घटना उघडकीस आल्यात. सोन्या-चांदीचे दागिने, कार असा 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 44, रा. मांजरी बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडून सुरू होता. घरफोड्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसह संबंधित घरफोडीच्या घटना केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने त्यास सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, कार असा एकूण 31 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Watch: ‘तुम्ही मुलं मला हार्ट अ‍टॅक आणाल’ मैदानावरचे अंपायर भारतीय खेळाडूंना असं का म्हणाले?

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Manisha Kayande : ‘ही तर भारतीय ट्रोलर्स पार्टी, त्यांना वैफल्यानं ग्रासलंय’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें