Pune Worker Death : अंगावर झाड पडून इंदापूरात वन कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, बांधकाम विभागाचे कर्मचारी झाड तोडत असताना घडली घटना

झाड तोडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी रस्ता अडवून वाहतूक थांबवणे गरजेचे होते. परंतु त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही.

Pune Worker Death : अंगावर झाड पडून इंदापूरात वन कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, बांधकाम विभागाचे कर्मचारी झाड तोडत असताना घडली घटना
संशयातून तरुणावर जीवघेणा हल्लाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 12:52 AM

पुणे : इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथील लिंबाचे झाड तोडत असताना ते झाड (Tree) अंगावर पडून एका वन कर्मचाऱ्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी झाड तोडत असतानाच मयत कर्मचारी तेथून दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी झाड त्यांच्या अंगावर पडले आणि यात त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानदेव बाबुराव ससाणे (55 रा. कळस, ता. इंदापूर) असे मयत वन कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत इंदापूर पोलीस (Indapur Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

झाड अंगावर पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी शुक्रवारी सकाळी ठिक सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बाब्रस मळा येथील अनपट गॅरेज समोरील लिंबाचे झाड तोडत होते. याच दरम्यान ज्ञानदेव ससाणे आपल्या दुचाकीवरुन तेथून चालले होते. यावेळी हे झाड त्यांच्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. झाड तोडत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी रस्ता अडवून वाहतूक थांबवणे गरजेचे होते. परंतु त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ज्ञानदेव ससाणे यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

संबंधितांवर कारवाईची नातेवाईकांची मागणी

सदरील घटना घडल्यापासून सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी याबाबत मयताच्या नातेवाईकांना कशामुळे घटना घडली याची माहिती दिली नाही. अथवा सांत्वन देखील केले नाही. नाईलाजस्तव मृतदेह कार्यालय येथे आणला होता. एवढी मोठी घटना घडून देखील कार्यालयात माहिती सांगू शकेल असा एकही अधिकारी उपस्थित नाही. आम्हाला न्याय मिळावा व घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. (Unfortunate death of a forest employee in Indapur after a tree fell on him)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.