Pune Crime : पोलीस आहेत की सराईत..? चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांकडून चोरी, संधी मिळताच हात मारला, काय घडलं नेमकं?

कायद्याचे रक्षक भक्षक बनले तर ? कुंपणानेच शेत खाल्लं तर ? मग दाद कोणाकडे मागायची ? कुंपणानेच शेत खाल्ल्याचा, असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. सुशिक्षितांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच पोलिसांनी कायदा मोडत चक्क चोरी केली आहे, ती देखील पोलिस स्टेशनमध्येच.

Pune Crime : पोलीस आहेत की सराईत..? चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांकडून चोरी, संधी मिळताच हात मारला, काय घडलं नेमकं?
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 12:06 PM

अभिजित पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 30 जानेवारी 2024 : शहरात कायदा-सुव्यवस्था रहावी, नागरिकांना निर्धोकपणे जगता यावं, गुन्हेगारांना वचक बसावा, गुन्हे वाढू नयेत यासाठी पोलिस दल सतत कार्यरत असतं. गुन्हेगारांवर वचक ठेवणे आणि कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे हे पोलिसांचे कर्तव्य. पोलिस रात्रंदिवस, न थकता कर्तव्य बजावतात, म्हणून आपण शांतपणे राहू शकतो. पण कायद्याचे हेच रक्षक भक्षक बनले तर ? कुंपणानेच शेत खाल्लं तर ? मग दाद कोणाकडे मागायची ?

कुंपणानेच शेत खाल्ल्याचा, असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. सुशिक्षितांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच पोलिसांनी कायदा मोडत चक्क चोरी केली आहे, ती देखील पोलिस स्टेशनमध्येच. हो , हे खरं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच दरोडा टाकला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप असून त्यांनी गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी सरळ विकून टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आलं आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

असा उघडकीस आला गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीची कसून चौकशी केली एक धक्कादायक माहिती समोर आली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली. या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने, त्या बाजारात विकण्यास सांगितले, असेही आरोपीने कबूल केले.

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. काल या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.