AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती मध्यरात्री येते आणि लहान मुलांना पळवून नेते, पुण्यात दहशत, 140 सीसीटीव्ही कॅमेरे…

पुण्यात लहान मुलीचे अपहरण करून भीक मागण्यासाठी लावणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कात्रजमधील दोन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तुळजापूर येथील ही टोळी तिला भीक मागायला लावत होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टोळीचा मागोवा घेत पाचही आरोपींना अटक केली आणि बालिकेची सुखरूप सुटका केली. न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ती मध्यरात्री येते आणि लहान मुलांना पळवून नेते, पुण्यात दहशत, 140 सीसीटीव्ही कॅमेरे…
मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाशImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 10:25 AM
Share

पुण्यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीमुळे दहशतीचे वातावरण होते. भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या तुळजापुरातील 5 जणांची टोळी अखेर गजाआड झाली आहे. कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. सुनील सिताराम भोसले (वय 51), शंकर उजण्या पवार (वय 50) शालुबाई प्रकाश काळे (वय 45) गणेश बाबू पवार (वय 35) आणि मंगल हरफुल काळे (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. हे सर्वजण मोतीझारा, ता. तुळजापूर, जी धाराशिव येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनसिंग हनुमंत काळे (वय 25) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी धनसिंग काळे हे कात्रज येथील वंडरसिटीजवळ झोपडीवजा घरात राहतात. त्यांना चार मुले आहेत. यातील दोन वर्षाच्या दोन जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्री ते गाढ झोपेत असताना त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. मध्यरात्री जाग आल्यानंतर आपली छोटी लेक सापडत नसल्याचे धनसिंग यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी झोपेतून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार नोंदवली जाताच पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

असा केला पर्दाफाश

तपासादरम्यान वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्हीत दुचाकीवर तिघेजण या चिमुरडीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे 1-2 नव्हे तब्बल 140 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तिघांव्यतिरिक्त आणखी दोघे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची ओळख पटवून माहिती घेतली असता सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारती विद्यापीठ तपास पथकाला मिळाली.

अखेर चिमुरडी सुखरूप सापडली

त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व अंमलदार आणि गुन्हे शाखेचे एक पथक अशी दोन पथके तुळजापूर या ठिकाणी गेले. आणि धाराशिव पोलिसांच्या मदतीने सुरुवातीला तीन आरोपी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहरण झालेली 2 वर्षांची चिमुरडी सुखरूप सापडली. त्यानंतर अधिक चौकशी करत पोलिसांनी इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. भीक मागण्यासाठी आरोपींनी या चिमुरड्या मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या पाचही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.