AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर

पुण्यात पुन्हा एकदा एक अपघात घडला आहे. शहरात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा अपघाता एवढा भीषण होता की टेम्पो आणि ती कार दोघांच्याही पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता.

Pune : पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर
Image Credit source: social media
| Updated on: Jul 18, 2024 | 11:58 AM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथील ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत आहे. या अपघाता अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून बाईकस्वारांना उडवले, त्यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा असाच एक अपघात घडला आहे. शहरात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्हीने टेम्पो ट्रकला धडक दिली, ज्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लीनर असे दोघे जण जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एका नेत्याचा मुलगा ही कार चालवत होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. शरद पवार यांच्या पक्षातील नेते, बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ ही कार चालवत होता, आणि अपघातावेळी तो दारूच्या नशेत होता. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनसान रस्त्यावरून एक ट्रक जात असताना समोरून भरधाव वेगाने एक कार आली. टेम्पो चालकाने गाडी वळवण्याचाही, बाजूला घेण्याचाही प्रयत्न केला, पण तेवढ्यात कारने पुढच्या बाजूने जोरदार धडक दिली.

हा अपघाता एवढा भीषण होता की टेम्पो आणि ती कार दोघांच्याही पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही बरेच जखमी झाले. दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे कोंबड्या टेम्पोतून रस्त्यावर पडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय. या अपघाताप्रकरणी आरोपी सौरभ गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघाताच्या सुमारे दोन महिन्यांनंतर हा अपघाता झाला आहे. तर गेल्या आठवड्यात मुंबईती वरळी येथेही एका बीएमडब्ल्यू कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. त्यानंतर खाली पडलेल्या महिलेला चिरडले आणि ती कारखाली अडकल्यानंतर सुमारे दीड किलोमीटर तिला तसेच फरपटत नेले. अखेर कावेरी नाखवा या महिलेचा त्यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे (माजी) उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याला पोलिसांनी अटक केली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.