AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Bus Rape Case : ‘तू वर चढून टॉर्च मारुन बघ, तितक्यात…’, शिवशाही बसमध्ये बलात्कार, नेमकं काय घडलं?

Pune Shivshahi Bus Rape Case : : पुण्यासह सगळ्या राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला? तपास कसा सुरु आहे? या बद्दल माहिती दिली.

Pune Bus Rape Case : 'तू वर चढून टॉर्च मारुन बघ, तितक्यात...', शिवशाही बसमध्ये बलात्कार, नेमकं काय घडलं?
Pune Bus Rape Case
| Updated on: Feb 27, 2025 | 12:12 PM
Share

पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला? तपास कसा सुरु आहे? या बद्दल माहिती दिली आहे. “पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं”

“त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.

मित्राला फोन लावला

“त्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी मुलगी उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. मित्राच्या सल्ल्यावरुन तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच आम्ही कारवाई सुरु केली” अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी शिरुर गावचा

“आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर गावचा आहे. त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून आठ टीम काम करत आहेत” असं पोलिसांनी सांगितलं.

…तर तिला काही मदत मिळू शकली असती

बसमध्ये बलात्कार होतो, आजूबाजूला कोणाला कळत नाही. बस लॉक केली नाही ही चूक चालकाची की वाहकाची? सिस्टिममध्ये त्रुटी आहेत असं वाटतं नाही का? या प्रश्नावर “पोलिसांच पेट्रोलिंग सुरु असतं. पण प्रत्येक बस पोलीस चेक करु शकत नाहीत. ही बस आतमध्ये होती. घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथे आरडाओरडा केला असता, तर तिला काही मदत मिळू शकली असती” असं पोलीस म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी