Pune : खेळणारा चिमुरडा दिसलाच नाही… अचानक कार आली आणि… काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेने पुणेकर हादरले; अख्खी घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात लोणी काळभोर येथील सोसायटीच्या आवारात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खेळणाऱ्या नातवाला आजीसमोरच एका कारने धडक दिली, यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोसायटीमधील वाहन सुरक्षा आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

लहानग्या नातवाला खेळायला घेऊन त्याची आजी सोसायटीच्या आवारात उतरली, मात्र त्याच क्षणी घात झाला. सोसायटीच्या आवारा खेळणाऱ्या अवघ्या 5 वर्षांचा चिमुकला गाडीची ध़क बसून खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून त्या मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षणापूर्वी हसता खेळता असलेल्या नातवाच्या मृत्यूमुळे त्याच्या आजीला प्रचंड धक्का बसून असून मुलगा गेल्यान कुटुंबीयाही शोकाकुल आहेत. त्यांच्या दु:खाला , डोळ्यातील अश्रूंना खळ नाही. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे.
खेळणारा चिमुरडा दिसलाच नाही… अचानक कार आली आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटीमध्ये हा पाच वर्षीय मुलगा हा त्याच्या सायकलवर सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळत होता. खेळता खेळता तो पुढे आला, मात्र अचानक त्याच ठिकाणाहून जात असलेल्या कार समोर आली. आणि चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कारची त्या मुलालाला धडक बसली. गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरी सुद्धा वाहनाची धडक बसल्यामुळे तो मुलगा खाली पडला आणि काखाली चिरडला गेला. यात त्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी चिमुरड्याचे वजडील आश्वत स्वामी (वय 40, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्वत स्वामी यांची सासू, त्यांच्या लहान नातवाला घेऊन सोमवारी (19 जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आल्या होत्या. सोसायटीच्या आवारात तो मुलगा सायकलवर खेळत होता. मात्र तेवढ्यातच सोसायटीच्या आवारात मोटारीने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे सोसायटीमधील वाहन सुरक्षा आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
