पोलीस बनले समलैंगिक; 16 तरूण, 3 तरुणींना लूटणारी महिला गजाआड!

डेटींग अॅपवरून 16 तरुण आणि 3 तरुणांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. (Pune: Woman arrested for robbing 16 men she met through online dating app )

पोलीस बनले समलैंगिक; 16 तरूण, 3 तरुणींना लूटणारी महिला गजाआड!
Husband Attack On Gym Owner

पुणे: डेटींग अॅपवरून 16 तरुण आणि 3 तरुणांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. पोलिसांनी समलैंगिक असल्याचा बनाव करून या महिलेशी दोस्ती वाढवली आणि तिचा मोबाईल नंबर मिळताच तिच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune: Woman arrested for robbing 16 men she met through online dating app )

पुण्यातील एका 27 वर्षीय महिलेने 16 तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांच्याकडून सोने-चांदी आणि हजारो रुपये उकळले. बम्बल डेटींग अॅपच्याद्वारे ही महिला तरुणांशी चॅटींग करून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असायची. हॉटेलमध्ये रात्र घालवण्याच्या बहाण्याने ही महिला तरुणांना हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे गेल्यावर या तरुणांच्या दारूत झोपेची गोळी टाकायची. तरुण बेहोश होताच ती त्यांच्याकडील सोनं, अंगठी, रोखरक्कम आणि मोबाईल घेऊन पसार व्हायची. या तरुणांकडे कोणताही पुरावा राहू नये म्हणू ही तरुणी या तरुणांच्या मोबाईलमधील सीम कार्ड काढून टाकायची. त्यांच्या मोबाईलमधील डेटींग अॅपही डिलीट करायची. त्यानंतर हा फोन फेकून द्यायची, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

उच्च शिक्षित, बड्या कंपनीत नोकरीला, पण आदत से मजबूर

पकडण्यात आलेली महिला शिकलेली आहे. मोठ्या कंपनीतही कामाला आहे. परंतु, तिच्या या सवयींमुळे तिला कामावरून काढून टाकलं असावं. तक्रारदार केवळ एका महिलेने फसवल्याचं सांगायचे आणि डेटींग अॅपचं नाव सांगायचे. त्यांच्याकडे इतर कोणतीही माहिती नसायची. त्यामुळे या महिलेचा शोध घेणं अत्यंत कठिण होतं, असं कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं.

वर्णनावरून तपास

तक्रारदारांनी या महिलेचं वर्णन केल्यानंतर पोलिसांनी या डेटींग अॅपवरून तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, डेटींग अॅपवर या महिलेचा नंबरही नव्हता आणि तिच्या घराचा पत्ताही नव्हता. त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचणं कठिण होतं, असं त्यांनी सांगितलं.

समलैंगिक बनून पकडले

पिंपरी-चिंचवडच्या क्राईम ब्रँच युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे आणि त्यांच्या टीमने या महिलेचे ग्राहक बनवून डेटींग अॅपवरून तिला दोस्ती करण्याची ऑफर केली. वारंवार ऑफर देऊनही या महिलेने त्याचा स्वीकार केला नाही. त्याचवेळी या महिलेने चार बंबल अकाउंटवरील एका अकाउंटमध्ये ती समलैंगिक असल्याचा उल्लेख केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी एक तरुणीचं बनावट अकाउंट क्रिएट केलं. ही तरुणी समलैंगिक असल्याचं तिच्या या अकाउंटवर नमूद केलं. त्यानंतर आरोपी महिलेला या तरुणीने मैत्री करण्याची ऑफर दिली अन् आरोपी महिलेने ही ऑफर स्वीकारलीही. त्यानंतर दोघींमधील गप्पाही वाढल्या आणि दोघींनी एकमेकांचे मोबाईल नंबरही एकमेकींना शेअर केले. पोलिसांना हा नंबर मिळताच थेट आरोपी महिलेच्या घरी जाऊन पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर या महिलेची कसून चौकशी केली असता तिने 16 तरुण आणि तीन तरुणींना फसवल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत. (Pune: Woman arrested for robbing 16 men she met through online dating app )

संबंधित बातम्या:

Big News : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, अश्लिल व्हीडिओ शेअर केल्याचा आरोप

Fact Check: तिवशाची ती महिला IAS झालीच नाही? मंत्री यशोमती ठाकूरांचीही दिशाभूल ?

पोलिसांनो, निधर्मी भावनेने कारवाई करा – हायकोर्ट

(Pune: Woman arrested for robbing 16 men she met through online dating app )

Published On - 10:05 am, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI