AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लुधियाना डबल मर्डर केस, शेजारच्या अल्पवयीन मुलांचा खून करुन आरोपीची आत्महत्या

लुधियानामध्ये एका व्यक्तीने आपल्या शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली (Double Murder Case In Ludhiana).

लुधियाना डबल मर्डर केस, शेजारच्या अल्पवयीन मुलांचा खून करुन आरोपीची आत्महत्या
Murder
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 08, 2021 | 9:09 AM
Share

चंदीगड : लुधियानामध्ये एका व्यक्तीने आपल्या शेजारच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली (Double Murder Case In Ludhiana). त्यानंतर शनिवारी लुधियानाच्या राजीव गांधी कॉलनीमध्ये एका भाड्याच्या खोलीत या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली (Punjab Minor Sons Double Murder Case In Ludhiana Accused Died By Suicide After Murder).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप, 22 वर्षीय शैलेन्द्र कुमार जो एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. त्याने शेजारच्या भाड्याच्या खोलीत जाऊन एका 6 आणि 8 वर्षाच्या चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्याने गच्ची फिर छपरावरुन गळफास घेत आत्महत्या केली.

एसएचओ फोकल पॉईंट ठाण्याचे निरिक्षक दविंदर कुमार यांनी सांगितलं की, जेव्हा पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा शैलेंद्रचा मृत्यू झालेला होता. “मुलांची आई मागच्या खोलीत कपडे धूवत होती. मुलांनी आरडाओरड केल्याने ती आत आली. शैलेंद्र तिला त्रास द्यायचा. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलांचा गळा चिरण्यासाठी त्याने धारदार शस्त्राचा वापर केला.

मुलांचा आरडाओरड

मुलांचा आरडाओरड ऐकून स्थानिक लोकांनी तिथे गोंधळ घातला आणि दार तोडण्याचा प्रयत्न केला. जो आरोपीने आतून बंद केला होता. पण मोठ्या कालांतराने ते आत प्रवेश करण्यात यशस्वी झाले. स्थानिक लोकांनी पोलिसांना सूचना दिली आणि मुलांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं.

महिला मीनू तिवारीचे पती शिव शंकर तिवारी यांच्यानुसार, आरोपीने शुक्रवारी सायंकाळी माझ्या पत्नीविरोधात असभ्य टिप्पणी केली. ज्यानंतर तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तिवारीने पोलिसांना सांगितलं की, शैलेंद्र त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा आणि तीन महिन्याआधी त्यांनी शैलेंद्रला मारलं होतं.

एसएचओने सांगितलं की जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हापर्यंत आरोपीचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृत्यूंमध्ये सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत चौकशी करण्यात आली होती.

Punjab Minor Sons Double Murder Case In Ludhiana Accused Died By Suicide After Murder

संबंधित बातम्या :

कल्याणमध्ये चप्पलचं दुकान जळून खाक, 6 दिवसानंतर साफसफाई करताना लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ

त्यानं आधी बापावर चाकूचे सपासप वार केले, नंतर आजोबालाही गाठलं; शेवटी त्यानं जे केलं त्यानं मुंबई हादरली!

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ