लाज वाटली पाहिजे भावाच्या मृत्यूवर व्ह्यूवर्स, पैसे कमावतेय?; राजा रघुवंशीच्या बहिणीवर संतापले नेटकरी
राजा रघुवंशीच्या निधनानंतर त्याची बहिण सोशल मीडियावर प्रमोशनल रिल्स शेअर करताना दिसत आहे. तसेच ती भावाच्या निधनाचे भांडवल करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

राजा रघुवंशी याच्या खुनाच्या प्रकरणात खुनाचा आरोप त्याची पत्नी सोनम रघुवंशीवरच लावण्यात आला आहे. तिने कट रचून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तिने त्यासाठी 4 जाणांना नेमलं होतं. या कटात सोनमचा एक्स बॉयफ्रेंड राज कुशवाहासह इतर काही लोकांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे आणि या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती मुलगी म्हणते, “…आवडत नव्हता तर मारलं कशाला, पळून गेली असतीस.” खरंतर हा व्हिडिओ राजा रघुवंशीच्या बहिणीचा आहे. तिचा हा व्हिडीओपाहून लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
कोण आहे राजाची बहिण?
राजा रघुवंशी याची बहीण सृष्टी रघुवंशी ही इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिचं अकाउंट पाहिल्यावर असं वाटतं की सृष्टी एक इंस्टा इन्फ्लूएन्सर आहे. या अकाउंटवर आता तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे ३.८८ लाख फॉलोअर्स आहेत. तिने प्रोमोशनसाठी तिच्या बायोमध्ये लिहिलं आहे, ज्यावरून ती इन्फ्लूएन्सर असल्याचं समजतं. तिने भावाच्या निधनानंतर देखील काही प्रमोशनल व्हिडीओ शेअर केले. ते व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
वाचा: सोनम खूनी नाही? भावाच्या वक्तव्याने खळबळ, राजा रघुवंशी प्रकरणात मोठा ट्विस्ट!
View this post on Instagram
जेव्हा राजा आणि सोनम रघुवंशी बेपत्ता झाल्याच्या बातम्या आल्या, तेव्हापासून सृष्टी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ बनवून लोकांना आवाहन करत होती की, जर कोणाला तिच्या भावाबद्दल काही माहिती असेल तर कळवा. राजाच्या खुनाची बातमी समोर आल्यापासून सृष्टीने या प्रकरणावर अनेक व्हिडीओ टाकले आहेत.
आपल्या भावाच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, इंदौरच्या या इन्फ्लूएन्सरने इंस्टाग्रामवर रील्स आणि पोस्ट टाकून सोनम रघुवंशीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. सृष्टीने सोनमवर तिच्या भावाला “मारण्याचा” आरोपही लावला आहे. मात्र, अनेक लोक सृष्टीच्या व्हिडीओवर कमेंट करुन टीका करत आहेत. राजावर बनवलेल्या अनेक रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्समुळे काही लोक लिहू लागले आहेत की, सृष्टी आपल्या भावाच्या मृत्यूचा वापर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहे.
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर सृष्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका यूजरने ‘लाज वाटली पाहिजे भावाच्या मृच्यूवर व्ह्यूवर्स मिळवते. असे करुन पैसे कमातेय का?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘हिचा भाऊ मेलाय आणि बहिणीला सोशल मीडियावर यूजर्स आणि व्ह्यूवर्स हवेत… लाज वाटत नाही का?’ या शब्दात सुनावले आहे.