AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Raghuvanshi Murder Case : मंगळसूत्रामुळे सोनमचा पर्दाफाश, राजाला संपवताच तिने थेट…

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी खून प्रकरणात नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. लग्नात राजाने सोनमला जे मंगळसूत्र घातलं त्याच मंगळसूत्राने पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचवलं. या सर्व् प्रकरणात तिच्या मंगळसूत्राची प्रचंड महत्वाची भूमिका होती, मेघालय पोलिसांनी त्या संदर्भातील माहिती दिली आहे.

Raja Raghuvanshi Murder Case : मंगळसूत्रामुळे सोनमचा पर्दाफाश, राजाला संपवताच तिने थेट...
राजा रघुवंशी मर्डर केसImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 12, 2025 | 8:36 AM
Share

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलिस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. या मर्डर केसमध्ये रोज नवनवे खुलासे होतानाही दिसत आहेत. या घटनेच्या सुरूवातीस हे अपहरणाचे प्रकरण आहे, मिसिंग केस आहे की मर्डरची केस, हे शिलाँग पोलिसांना माहीतच नव्हतं. पण तपास करत असतानाच पोलिसांच्या हातात एक मोठा सुगावा लागला आणि राजाचा मृत्यू म्हणजे हत्याच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्याचा कसून शोध सुरू केला. खरं तर, 2 जून रोजी पोलिसांना वायजे डोंगमध्ये राजाचा मृतदेह सापडला. घटनास्थळी पोहोचल्यावर शिलाँग पोलिसांना वाटले की हा अपघात असू शकतो, परंतु राजाची पत्नी सोनम देखील बेपत्ता होती.

त्यानंतर शिलाँग पोलिस चौकशी करत करत सोनम रहात असलेल्या शिप्रा स्टे होम येथे पोहोचले असता, त्यांना तेथे सोनमची बॅग सापडली. पोलिसांनी बॅगची झडती घेऊन तपसणी केली असता पोलिसांना त्यात सोनमचे मंगळसूत्र सापडलं. ते पाहून पोलिस चक्रावलेच, एखादी नवविवाहित महिला मंगळसूत्राशिवाय कशी राहू शकते ? असा प्रश्न त्यांना पडला. लग्नात राजाने घातलेलं मंगळसूत्र सोनमने गळ्यात न घालता सूटकेसमध्ये का ठेवलं ? असा सवाल सर्वांच्याच मनात होता. हीच बाब पोलिसांना खटकली आणि त्यांच्या संशयाची सुई गायब असलेल्या सोनमवर गेली.

मृतदेहाच्या स्थळी सापडलं हत्यार

सोनमने राजाची हत्या केली असावी आणि नंतर ती फरार झाली असावी असा संशय पोलिसांना आला. तिच्यावर संशय येण्याचे आणखी एक कारण म्हणजे हत्येत वापरलेले शस्त्र. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणाजवळ हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही सापडलं. त्यामुळेच राजाचा मृत्यू म्हणजे अपघात नव्हे तर एक प्लॅन्ड मर्डर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना सोनमवरच संशय येण्याचं तिसरं कारण म्हणजे हनीमूनला येऊनही सोनमने सोशल मीडियावर एकही कपल फोटो अपलोड केला नव्हता, त्यामुळे त्यांचा संशय आणखीनच बळावला.

सोशल मीडियावर फोटोच नाही

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिमूनसाठी जाणारं जोडपं बऱ्याचवेळा दररोज सोशल मीडियावर त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करतात, परंतु सोनमने हनिमूनसाठी घर सोडल्यानंतर तीन दिवसांपर्यंत सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ किंवा फोटो अपलोड केला नव्हता. पोलिसांना सोनमवर अधिक संशय आला आणि त्यांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यांना राजचा नंबर सापडला.

हत्येच्या ठिकाणापासून 10 किमी अंतरावर सीसीटीव्हीत कैद झाली सोनम

त्यानंतर पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना, त्यांना हत्येच्या ठिकाणापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर सोनम आणि कॉन्ट्रॅक्ट किलरचे सीसीटीव्ही फुटेज आढळले. त्यामुळे या हत्येमागे दुसरं-तिसरं कोणी नसून राजाची पत्नी सोनमच आहे, याची पोलिसांना खात्री पटली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, हत्येच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर, सोनम टॅक्सी किंवा कारने पुढे गेली आणि ते कॉन्ट्रॅक्ट किलर देखील तेथून वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेले.

आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी

या हत्याकांडाप्रकरणी मेघालय पोलिसांनी सोनम आणि राजसह 5 आरोपींना अटक केली. त्यांना शिलाँगला आणण्यात आले आहे. सर्व आरोपींना काल (11 जून) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालसमोर हजर झाल्यानंतर शिलाँग पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांचा रिमांड मागितला, त्यानंतर न्यायालयाने सोनमसह सर्व आरोपींना8दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. आता पोलिस त्यांची चौकशी करतील.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.