AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बायकांचा एकच नवरा, चोरीमध्ये दोघीपण बाप, एकदम वेगळीच आहे यांची गोष्ट

दोन महिलांच एकाच पुरुषासोबत लग्न झालं. दोघीपण चोर. दोघी परस्परांच्या सवत आहेत. या प्रकरणात दोघींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे झाले आहेत.

दोन बायकांचा एकच नवरा, चोरीमध्ये दोघीपण बाप, एकदम वेगळीच आहे यांची गोष्ट
Representative Image Image Credit source: Meta AI
| Updated on: Jul 14, 2025 | 2:51 PM
Share

राजस्थानच्या झुंझुनूमध्ये पोलिसांनी दोन चोर महिलांना अटक केलीय. त्यांच्या चोरी संदर्भात हैराण करणारा खुलासा झाला आहे. या स्टोरीमध्ये दोन महिलांनी केलेल्या चोरीचा समावेश आहेच. पण नात्याचा सुद्धा अँगल आहे. अटक केलेल्या दोन्ही महिलांच एकाच व्यक्तीशी लग्न झालं आहे. म्हणजे दोघी परस्परांच्या सवत आहेत. या दोघी झुंझुनूमध्ये चोरी करायच्या.

दोघी ऑटोमध्ये बसून लोकांचे दागिने आणि बॅग्स लंपास करायच्या. कोतवाली पोलिसांना दोन्ही महिलांकडे चोरी केलेले दागिने मिळाले आहेत. त्याची किंमत एक लाख रुपयापेक्षा जास्त आहे. चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलांची नावं सावित्री (30) आणि राजोदेवी (40) आहेत. दोघांच्या पतीच नाव शेर सिंह बावरिया आहे. दोन्ही महिला अलवर जिल्ह्यातील निमराना माधोसिंहपुरा येथे राहणाऱ्या आहेत.

कशी होती चोरीची पद्धत?

दोन्ही महिला प्रवासी म्हणून रिक्षात बसायच्या. त्यानंतर चोरीच कृत्य करायच्या. एक महिला कव्हर द्यायची आणि दुसरी चोरी करायची. दोघी इतक्या सफाईदारपणे चोरी करायच्या की कोणाला काही समजायचच नाही. पोलिसांना एका चोरीच्या प्रकरणात या दोघींबद्दल समजलं. 11 एप्रिल रोजी मंडावाच्या भारू गावातील एका व्यक्तीने पोलीसात चोरीची तक्रार केली होती.

किती लाखाचे दागिने विकत घेतले?

त्या व्यक्तीने सांगितलं की, त्याने पत्नीसोबत झुंझुनूंमधील एका ज्वेलर्सच्या शोरुममधून एक लाख रुपयाचे दागिने विकत घेतले. दागिने विकत घेऊन तो रिक्षाने घरी येत होता. त्यावेळी गांधी चौकाच्या दिशेने जाताना प्रभात टॉकीजजवळ तीन महिला रिक्षात बसल्या. काहीवेळाने तो पत्नीसोबत रिक्षातून उतरला. त्यावेळी त्याच्या बॅगची चैन उघडी होती. त्यातून दागिने गायब होते.

पोलिसांनी कसं शोधून काढलं?

ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास केला. प्रभात टॉकीज ते गांधी चौक पर्यंतच सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या दरम्यान पोलिसांनी संशयित महिलांची ओळख पटवली. अखेर चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत दोघींनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपी महिलांच्या पतीची भूमिका सुद्धा तपासली जात आहे.

पोलिसांना अजून काय संशय?

पोलिसांना दोन्ही महिलांच्या पतीवर संशय आहे. तो चोरीचे दागिने विकण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी असू शकतो. अजूनपर्यंत या प्रकरणात पती सहभागी असल्याच सिद्ध झालेलं नाही. पण पोलीस तपास सुरु आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.