24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

दोन वर्षांपूर्वी एका तरुणाचे लग्न झाले होते. मात्र त्याची 19 वर्षीय पत्नी आणि 24 वर्षीय पुतण्या यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. गेल्या 16 नोव्हेंबरच्या रात्री काकी आणि पुतण्या घरातून पळून गेले. दोघांचे कुटुंब त्यांचा शोध घेत आहेत.

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच...
प्रातिनिधीक फोटो


जयपूर : पुतण्या आपल्या नुकत्याच झालेल्या लग्न झालेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर संधी पाहून दोघेही घरातून पळून गेले. राजस्थानच्या भरतपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर पीडित काकांनी आपल्या पुतण्याविरुद्ध पत्नीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. “मी तिला आणि पुतण्याला एकदाच नाही, तर खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नव्हते” अशी प्रतिक्रिया काकाने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण राजस्थानच्या भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. किशनपूर कॉलनीत दोन वर्षांपूर्वी एका तरुणाचे लग्न झाले होते. मात्र त्याची 19 वर्षीय पत्नी आणि 24 वर्षीय पुतण्या यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. गेल्या 16 नोव्हेंबरच्या रात्री काकी आणि पुतण्या घरातून पळून गेले. दोघांचे कुटुंब त्यांचा शोध घेत आहेत.

काकाचं म्हणणं काय?

पीडित काकाने सांगितले की, 16 नोव्हेंबरच्या रात्री माझी पत्नी आणि पुतण्या हे दोघेही घरातून पळून गेले. त्यांचा शोध सुरू असून, दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकाने सांगितले की, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनाही अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मान्य न झाल्याने संधी साधून ते पळून गेले.

आजीची नातवाविरोधात तक्रार

त्याच वेळी, या प्रकरणावर पोलिसांचे म्हणणे आहे की, कमला नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिची सून तिच्या नातवाने पळवून नेली आहे. दोघांचाही सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही ते सापडले नाहीत. मथुरा गेट पोलिस स्टेशनचे एएसआय रामवीर सिंह यांनी सांगितले की, तक्रार नोंदवण्यात आली आहे. लवकरच दोघे सापडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ

पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने मारली उडी; आत्महत्येपूर्वी केले फेसबूक लाईव्ह

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI