AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या अटकेसाठी रेखा जरेंचा मुलगा आक्रमक, सहकुटुंब आमरण उपोषणाचा पोलिसांना इशारा

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी बाळ बोठेच्या अटकेसाठी रुणाल जरे याने उपोषणाचा इशारा दिला आहे. (Rekha Jare Runal Jare)

Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या अटकेसाठी रेखा जरेंचा मुलगा आक्रमक, सहकुटुंब आमरण उपोषणाचा पोलिसांना इशारा
रेखा जरे बाळ बोठे
| Updated on: Feb 28, 2021 | 1:07 PM
Share

अहमदनगर: अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी बाळ बोठेच्या अटकेसाठी त्यांच्या मुलाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने 5 मार्च रोजी सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा हजारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला नसल्यानं जरे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. (Rekha Jare Murder Case Runal Jare warning for arrest of Bal Bothe )

पाच आरोपींना अटक मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार

अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे हे अद्यापही फरार आहेत. रेखा जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरीही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. रुणाल जरे यांनी बाळ बोठे यांना राजकीय किंवा शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप रुणाल जरे याने केला आहे. जोपर्यंत बाळ बोठेला अटक केली जात नाही तोपर्यंत सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचं रुणाल जरे याने म्हटलंय.

बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झालीय. बोठेचा स्टॅंडिंग वॉरंट विरोधातील अर्ज पारनेरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय.

बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालंय. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले आहे. त्याविरोधात बोठे याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला.

तपास कसा झाला?

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केलंय. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे हा पसार झालेला आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यात आणि राज्यातही शोध घेतल्यानंतर बोठे पोलिसांना आढळून आलेला नाही. जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

न्यायालयात काय घडलं?

22 फेब्रुवारीला पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टँडिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत 2 वेळेस न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

संबंधित बातम्या:

रेखा जरे हत्याकांड, आरोपी बाळ बोठेचा फैसला पोलिसांसाठी महत्त्वाचा का?

बोठेच्या जामीनावरील सुनावणीत ‘हनीट्रॅप’चा उल्लेख, बोठे गजाआड की बाहेर? निर्णयाकडे लक्ष

(Rekha Jare Murder Case Runal Jare warning for arrest of Bal Bothe )

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.