Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा, कोर्टाने अर्ज फेटाळला

Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा, कोर्टाने अर्ज फेटाळला
Rekha Jare Murder Case

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झालीय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 22, 2021 | 6:40 PM

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झालीय. बोठेचा स्टॅंडिंग वॉरंट विरोधातील अर्ज पारनेरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय. या प्रकरणी 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज यावर सुनावणी झाली (Court reject application of Journalist Bal Bothe in Rekha Jare Murder case).

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालंय. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले आहे. त्याविरोधात बोठे याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला.

या प्रकरणी आधी 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी ठेवण्याचे आदेश दिले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ढगे यांनी काम पाहिले.

तपास कसा झाला?

जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केलंय. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे हा पसार झालेला आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यात आणि राज्यातही शोध घेतल्यानंतर बोठे पोलिसांना आढळून आलेला नाही. जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

न्यायालयात काय घडलं?

बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग  वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टँडिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत 2 वेळेस न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा :

Rekha Jare हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, बाळ बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी

Rekha Jare Murder | बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

Rekha Jare Murder | आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात, सुपारी, हत्येनंतर आणखी एक गुन्हा

व्हिडीओ पाहा :

Court reject application of Journalist Bal Bothe in Rekha Jare Murder case

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें