‘सैयारा’ स्कॅममध्ये अडकू नकोस भावा! I Love You… पोलिसांचा काय तो व्हायरल इशारा, तुमचं बँक बॅलेन्स शाबूत आहे ना?
Saiyaara Cyber Scam Alert : सैयारा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. पण पोलिसांनी या चित्रपटाच्या नावाचा वापर करून एक आवाहन केले आहे. एक्सवर पोस्ट करत पोलिसांनी हृदय द्या, पण I love you नंतर OTP पाठवू नका असा संदेश दिला आहे.

Cyber Fraud on Online Relationship : सध्या Saiyaara चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. तरुणाईत तर या सिनेमाची विशेष क्रेज आहे. मग पोलिसांनी या चित्रपटाच्या नावावरून सर्वांनाच मोठे आवाहन केले आहे. अनेकजण त्यांच्या जीवनाचा जोडीदार ऑनलाईन शोधतात. त्यांच्यासाठी पोलिसांनी एक खास मॅसेज दिला आहे. एक्सवर पोस्ट करत पोलिसांनी हृदय द्या, पण I love you नंतर OTP पाठवू नका असा संदेश दिला आहे. त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे पोलिसांचे आवाहन
उत्तर प्रदेश पोलिसांनी सोशल मीडिया खात्यावर ऑनलाईन रिलेशनशीप शोधणाऱ्यांना एक भन्नाट मॅसेज केला आहे. एक्सवर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. “सैयारा पाहून लोक चित्रपटगृहातच बेशुद्ध होत आहेत. पण तुमची शुद्ध तेव्हा हरपेल जेव्हा I Love You नंतर समोरची व्यक्ती तुम्हाला OTP पाठवण्याची विनंती करेल आणि थोड्याच वेळात तुमचे बँक खाते साफ होईल. बँलेन्स झिरो होईल.” पोलिसांचा हा मॅसेज सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे.
‘हृदय द्या, OTP नाही’
ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये आंधळी-कोशिंबीर खेळू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. अशा रिलेशनशीपमध्ये समोरील व्यक्ती आपल्याला फसवत तर नाही ना, याची लवकर खातरजमा होत नाही. भावनेच्या भरात, उत्साहात आपण आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करतो. ती व्यक्ती अचानक ओटीपी मागते आणि डोळे झाकून काही जण तो शेअर पण करतात. पण पुढे बँकेतील जमा रक्कम गायब झालेली असते. मग पश्चातापाव्यतिरिक्त काहीच हाती उरत नाही, असे अंजन पोलिसांनी घातले आहे.
‘सैयारा’ से ‘स्कैम ना हो जाये यारा’
‘सैयारा’ देखकर लोग सिनेमाघरों में बेहोश हो रहे हैं… लेकिन असली बेहोशी तब होगी, जब ‘I love you’ के बाद ‘OTP भेजो प्लीज़’ आएगा — और अकाउंट का बैलेंस ₹0 दिखाएगा।
❤️ दिल दें, OTP नहीं।#SaiyaaraSeSavdhaan#CyberSafeRaho #ThinkBeforeYouClick… pic.twitter.com/ewUqz0jiO2
— UP POLICE (@Uppolice) July 22, 2025
पोलिसांच्या मते, हृदय द्या, आय लव्ह यु म्हणा. पण ओटीपी काही शेअर करू नका. कारण ऑनलाईन फ्रॉडचा अजून एक प्रकार समोर आला आहे. त्यात ऑनलाईन सावज शोधल्या जाते. प्रेमाच्या गोष्टी होतात. आणाभाका होतात. खोटे फोटो शेअर केले जातात. एकदा विश्वास संपादन झाला की, सायबर भामटे मग वैयक्तिक माहिती जमवत, ओटीपी मागतात आणि समोरील व्यक्तीचे बँक खाते रिकामे करतात. अशी फसवणूक झाल्यास राष्ट्रीय मदत क्रमांक 1930 वर सायबर फ्रॉडची तक्रार नोंदवता येते. सरकारची साईट cybercrime.gov.in वर तक्रार करता येते.
