समीर वानखेडे यांचा गोव्यात कारवाईचा धडाका, एनसीबीकडून दोन महिलांना अटक

समीर वानखेडे यांचा गोव्यात कारवाईचा धडाका, एनसीबीकडून दोन महिलांना अटक
समीर वानखेडे

गोव्यात एनसीबीने एका परदेशी आणि एका गोव्यातीलच स्थानिक महिलेला ताब्यात घेतले आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील बारडेझ येथे ही कारवाई केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 02, 2022 | 8:24 PM

गोवा : 31 डिसेंबरच्या पार्टीला अनेक ठिकाणाहून ड्रग्ज येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती, त्यामुळेच एनसीबीने सगळीकडे आपले धाडसत्र सुरू ठेवले होते. त्यात अनेक ठिकाणी मोठा ड्रग्ज साठा सापडला आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीचे सर्वात जास्त आकर्षण असणारे ठिकाण म्हणजे गोवा, त्यामुळे एनसीबीने गोव्यावरही करडी नजर ठेवली होती. एनसीबीने अनेक पथकं तयार करून धाडी टाकल्या. त्यात एनसीबीला मोठं यश आलाय. गोव्यात एनसीबीने ड्रग्जसहीत दोन महिलाना अटक केली आहे.

एक परदेशी, एक स्थानिक महिला ताब्यात

गोव्यात एनसीबीने एका परदेशी आणि एका गोव्यातीलच स्थानिक महिलेला ताब्यात घेतले आहे. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील बारडेझ येथे ही कारवाई केली आहे.

या महिलांकडे काय मिळाले?

1 किलो मारीजुना
49 टॅबलेट
25 ग्राम अफेटामाईन
2.2 ग्राम कोकेन
1 ग्राम MDMA पावडर

या ड्रग्ससह एनसीबीने एक मोटारसायकलही जप्त केली आहे. परदेश नागरिक असलेली महिला ही ड्रग्स सप्लाय करायची तर स्थानिक महिला ही ड्रग्स विक्री करत होती. या परदेशी महिलेचा मोठ्या ड्रग्स टोळीशी संबंध असल्याचाही संशय एनसीबीला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक देशभरासह जगभरातून पर्यंटक गोव्यात दाखल होतात, त्यामुळे गोवा हे पार्टीसाठी फेवरेट स्थळ मानले जाते. अशा पर्यटकांना टार्गेट करत अनेक ड्रग्ज सप्लायर आणि ड्रग्ज विक्रेते गोव्यात सक्रिय होता, त्यांना आवर घालण्यासाठीच एनसीबीने हा कारवाईचा धडाका लावला होता.

पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात

मराठवाड्यातील जनतेला नवीन वर्षाचे गिफ्ट, नांदेड ते हडपसर रेल्वेला सुरुवात

‘दुसरी बायको!’ असं कुठं नाव असतंय व्हंय दुकानाचं? चेष्ठा न्हाय लेका, कराडमध्ये असतंय, ते बी सलूनचं!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें