AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या बापाने वाढवलं, त्यालाच घराबाहेर काढलं… सांगलीत नेमकं काय घडलं?

जखमी झालेल्या वडील आणि बहिणींनी पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वीच आरोपी मुलगा जोतिराम माळी याने पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने वडील दगडू माळी आणि बहि‍ण उज्वला या दोघांवर गंभीर आरोप केला.

ज्या बापाने वाढवलं, त्यालाच घराबाहेर काढलं... सांगलीत नेमकं काय घडलं?
| Updated on: Oct 03, 2025 | 12:44 PM
Share

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात संपत्तीच्या वादातून नात्यांची अब्रू वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या वडिलांच्या खांद्यावर बसून मुलगा मोठा झाला. त्याच वडिलांना मुलाने संपत्तीच्या हव्यासातून घराबाहेर काढले. एवढेच नव्हे तर आपल्या सख्ख्या बहिणींवरही जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जोतिराम माळी यांची बहीण उज्वला या १५ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धासाठी घरी नैवेद्य देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जोतिराम माळी याने वडील दगडू माळी यांच्यावर काठीने हल्ला केला. या हल्ल्यात बहीण उज्वला गंभीर जखमी झाली. तिला सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते. विशेष म्हणजे या हल्ल्यात जखमी झालेल्या वडील आणि बहिणींनी पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वीच आरोपी मुलगा जोतिराम माळी याने पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने वडील दगडू माळी आणि बहि‍ण उज्वला या दोघांवर गंभीर आरोप केला.

पीडित बहिण काय म्हणाली?

यानंतर वडिल आणि मुलगी उज्वला यांनी पोलिसात धाव घेतली. विट्यातील जोतिबा सेल्सचे मालक जोतिराम माळी आणि अनिता माळी यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. मी गेल्या चार वर्षांपासून वडिलांना सांभाळते. त्या दोघांनी माझ्या वडिलांना घरातून हकलून दिलं आहे. मी आईच्या श्राद्धानिमित्त दर्शनासाठी जाताना आम्हाला घरात जाऊ दिलं नाही. त्यावेळी आमच्यावर हल्ला केला. तो आम्हाला त्रास देतोय, आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतोय. आमच्यावर हल्ला करून तो मोकाट फिरत आहे. आम्ही मात्र न्यायासाठी भटकंती करत आहोत, अशी माहिती बहिण उज्वला यांनी दिली.

प्रकरणाचा तपास सुरु

या संपूर्ण प्रकरणात वडिलांच्या संपत्तीवर कब्जा करणे, त्यांना घराबाहेर काढणे आणि बहिणींवर हल्ले करून खोट्या तक्रारींचा खेळ खेळला जात आहे, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे मुलगी उज्वला गेल्या चार वर्षांपासून स्वतःचा संसार सोडून वडिलांची सेवा करत आहे. पीडित बहिणींनी आता महिला आयोगाने यात लक्ष घालावे आणि आरोपी भावावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे कायद्याने बंधनकारक असताना आटपाडीत या कायद्याची पायमल्ली झाली आहे, असेही पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...