लहान भावाला धंद्यासाठी 17 लाख देण्याचं ठरलं, पण रातोरात पैसे गायब, पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक माहिती उघड

लहान भावाला धंद्यासाठी 17 लाख देण्याचं ठरलं, पण रातोरात पैसे गायब, पोलिसांनी तपास केल्यावर धक्कादायक माहिती उघड
बँकांमध्ये कोट्यवधींची बेवारस रक्कम

पोलिसांनी या प्रकरणी 17 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जयंतीलाल रामलाल ओसवाल याला अटक केली आहे (Sangli Police arrest man who stole money from his shop).

शंकर देवकुळे

| Edited By: चेतन पाटील

Jul 11, 2021 | 6:45 PM

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथील अंबिका स्टील सेंटरमध्ये मंगळवारी (6 जुलै) चोरी झाल्याची तक्रार दुकानदाराने केली होती. दुकानातून मध्यरात्री 17 लाख 70 हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार दुकानदाराने केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु होता. चोरला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून अथक प्रयत्न केले. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतर चोरीची फिर्याद (तक्रारदार) देणाराच चोर निघाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 17 लाख 70 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जयंतीलाल रामलाल ओसवाल याला अटक केली आहे (Sangli Police arrest man who stole money from his shop).

लहान भावाला व्यवसायासाठी पैसे द्यायचं ठरलं

जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाचे दुकान आहे. तिथून तो सळी, सिमेंट, फरशी यासह अनेक प्रकारचे साहित्य विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. तिथे त्याच्या कुटुंबियांसह त्याचा लहान भाऊ प्रकाश हा देखील त्याच्यासोबत राहत होता (Sangli Police arrest man who stole money from his shop).

आधी चोरी, नंतर पोलिसात तक्रार

जयंतीलाल याच्या लहान भाऊ प्रकाश याला दुसऱ्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी कुटुंबातील सर्वानुमते प्रकाशला पैसे द्यायचे ठरले होते. पण जयंतीलाल याला लहान भावास व्यवसायासाठी पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने कट रचला. त्याने मंगळवारी संपूर्ण कुटुंबियांना कराड येथे जेवणासाठी नेले. यादरम्यान चोरी घडवून आणली. घरातील 17 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. त्यानंतर स्वत:हून पोलिसात तक्रार केली.

श्वान पथक तिथेच घुटमळायचं

जयंतीलाल याने केलेल्या तक्रारीनुसार चोरी झालेली रक्कम ही जास्त होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सुरुवातीला संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यानंतर घटनास्थळी श्वान पथक आणलं गेलं. मात्र, श्वानपथक हे आसपास घुटमळत होतं. त्यामुळे पोलिसांना चोरीचा छडा लावणं आव्हानच होतं.

अखेर तक्रारदाराकडून गुन्हा कबूल

पोलिसांना या दरम्यान तक्रारदार जयंतीलाल यांची वागणूक काहीशी संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी त्याचीच चौकशी सुरु केली. यावेळी त्याने आपला गुन्हा कबूल केला. लहान भावास पैसे द्यायचे नसल्याने मीच 17 लाख 70 हजार रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीनेच हा चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. आरोपीस अटक करून संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन, मालाडमधून मामूला बेड्या, नागपुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें