दीदीच्या दीरासाठी काळीज धडधडलं… नवरा आड आला, रात्री बोलावलं अन्… अशी एक घटना ज्यामुळे सर्वच सुन्न; तुम्ही वाचली का?
बिहारमधील सारण जिल्ह्यात एका महिलेचे तिच्या बहिणीच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध होते. पण तिच्या पतीला ते समजलं, त्याने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर...

मेरठमध्ये राहणाऱ्या, मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभचा त्याच्या पत्नीने, प्रियकरासह मिळून खून केला आणि मृतदेह ड्रममध्ये भरून ठेवला. काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती. त्याची, तशीच पुनरावृत्ती आता बिहारमधील सारण येथे झाली. तेथे सोनपूर गावाता एका महिलेने तिच्या आई आणि प्रियकरासह मिळून तिच्या पतीची गळा दाबून हत्या केली. पहिले तर त्या महिलेने तिच्या पतीला तिच्या पालकांच्या घरी बोलावले आणि नंतर, कट आखून, तिने तिच्या आई आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने मिळून पतीचा थेट काटाच काढला. महिलेने तिच्या आई आणि प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुनील कुमार असे मृताचे नाव असून तो वैशाली पोलिस स्टेशन परिसरातील माधोपूर राम येथील रहिवासी दुखी महातो यांचा मुलगा होता. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सुनील कुमार याचे लग्न तीन वर्षांपूर्वी सोनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिकारपूर गावातील तरूणीशी झाले होते. पण लग्न झाल्यापासून त्याची पत्नी तिच्या सासरच्या घरात राहत नव्हती. ती तिचा बहुतेक वेळ तिच्या आईवडिलांच्या घरी घालवत असे. त्यांच्या सुनेते, तिच्याच मोठ्या बहिणीच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते.
बहिणीचा दीर होता महिलेचा प्रियकर
बुधवार, 12 मे रोजी संध्याकाळी, सुनीलच्या पत्नीने त्याला शिकारपूर येथील तिच्या पालकांच्या घरी बोलावले. तिथे पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या आईने मिळून सुनीलचा गळा दाबून खून केला. त्या महिलेच्या बहिणीचा दीर आणि तिचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते, तो तिचा प्रियकर होता असं प्राथमिक तपासात आढळून आलं. आरोपीचे घर वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर ब्लॉकमध्ये आहे. तीन महिन्यांपूर्वीही प्रियकराने,त्याच्या प्रेयसीच्या पतीला सुनील याला घरी बोलावून मारहाण केली होती. तो सुनीलला सतत जीवे मारण्याची धमकी देत होता.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर गावकऱ्यांनी मृताच्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबातील सदस्य शिकारपूरला पोहोचले तेव्हा सुनीलचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. सोनपूर पोलीस ठाण्यातील धिकाऱ्यांनी आरोपी पत्नी आणि तिच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे सोनपूरच्या अतिरिक्त पोलिस स्टेशन अधिकारी मिनिमा कुमारी यांनी सांगितलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, त्यानंतर हाजीपूर सदर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले आणि ते कुटुंबीयांना सोपवण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सुनीलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य शोकाकुल आहेत.