सातारा हादरलं, धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

सातारा हादरलं, धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

साताऱ्यात युवकाच्या झालेल्या निर्घृण खुनाच्या घटनेने शहरातील समर्थ मंदिर परिसर हादरला आहे.

Nupur Chilkulwar

|

Dec 16, 2020 | 12:58 PM

सातारा : साताऱ्यात युवकाचा निर्घृण खून झाला आहे. या खुनाच्या घटनेने शहरातील समर्थ मंदिर परिसर हादरला आहे (Satara Youth Murder). सातारा शहरात समर्थ मंदीर परिसरात मंगळवारी रात्री उशिरा युवकाचा खुन झाला. या घटनेनंतर शहर पुरते हादरुन गेले आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे (Satara Youth Murder).

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारे समर्थ मंदिर परिसरात धारधार शस्त्राने वार करुन एका युवकाचा खून झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. बजरंग लक्ष्मण गावडे, असे या युवकाचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेत 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडली असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे (Satara Youth Murder).

24 तासात दुसरी हत्येची घटना

मंगळवारी साताऱ्यात दोन हत्येच्या घटना घडल्या. कराडमध्ये एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शहरातील बाराडबरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आदित्य गौतम बनसोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आदित्य हा 16 वर्षांचा होता. आदित्यवर धारदार शस्त्राने वार करुन तीन संशयीत फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

हत्येच्या या घटनांमुळे संपूर्ण सातारा शहर हादरलं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Satara Youth Murder

संबंधित बातम्या :

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान

गांजा तस्करी करणाऱ्या त्रिकूटास अटक, खरेदीनंतर 25 पटीने विकला जातो गांजा

बहीणीने नकार देताच भावानं गोळ्या घालून केलं ठार, हत्येचं कारण वाचाल तर पायाखालची जमीन सरकेल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें