शेजाऱ्याने चोरली बायकोची साडी, संशयावरून सेक्युरिटी गार्ड संतापला, रागावून त्याने थेट बंदूक …
साडी चोरण्यावरून झालेला वाद एवढा टोकाला गेला की त्यामध्ये एकाला त्याचा जीवच गमवावा लागला. नक्की काय झालं ते जाणून घेऊया..

गुडगाव | 18 ऑगस्ट 2023 : कोणाचं डोकं कशावरून सटकेल याचा काही नेम नाही. बघताबघता साधं भांडण मोठ्या वादात बदलतं. रागाच्या भरात माणूस अशी एखादी कृती करतो ज्याचा त्याला जन्भर पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. रागाच्या भरात अशीच एक घटना गुडगावमध्येही घडली. खरंतर तिथे साडी चोरल्याच्या (stole saree) आरोपावरून एक भांडण सुरू झालं , ज्याचा शेवट खूप हिंसक झाला. दोन व्यक्तींचा हा वाद जीवघेणा (crime news) ठरला.
शेजारील व्यक्तीने साडी चोरल्याचा आरोप एका महिलेने केला. त्यानंतर तिच्या पतीने शेजारच्या माणसाला याचा जाब विचारला, त्यांच्यात जोरदार भांडण झाले अन् रागाच्या भरात त्याच्यावर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी, स्वातंत्रदिनाच्या रात्री हा खळबळ जनक प्रकार घडला.
पिंटू (29) असे मृत इसमाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. डीएलएफ थाना फेज-2 ने हत्या आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून याप्रकरणातील आरोपी अजय व त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
मृत इसम पिंटूसोबत राहणारे अशोक दुबे यांनी सांगितले की, पिंटू गेल्या आठ वर्षांपासून नथुपूर गावात भाड्याने राहत होता. तो एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. तर आरोपी अजय हा पिंटूच्या शेजारी रहात असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील कासगंज येथे राहणारा आहे. मंगळवारी सकाळी अजयच्या पत्नीने पिंटूवर साडी चोरल्याचा आरोप करत त्याच्याशी भांडण सुरू केले. त्याने महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीच ऐकून घेतले नाही. त्यानंतर पिंटू कामावर निघून गेला. तेव्हा अजय हा घरी नव्हता. संध्याकाळी पिंटू कामावरून घरी आल्यावर अजय आणि त्याच्या पत्नीने पिंटूशी पुन्हा वाद घालण्यास सुरूवात केली.
त्यानंतर अजयने पिंटूला शिव्या देण्यास सुरूवात केली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला पण वाद काही थांबला नाही. संतापाच्या भरात अजय त्याच्या घरातून पिस्तुल घेऊन आला आणि त्याने पिंटूवर गोळी झाडली. पिंटूसोबत राहणारे अशोक हे तेव्हा घरात जेवण बनवत होते, त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला व ते तत्काळा बाहेर आले. जखमी अवस्थेतील पिंटूला त्यांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अज व त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
